Raghav Chadha Suspended : आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित; सभापती धनखडांची मोठी कारवाई!

AAP MP Raghav Chadha Suspended From Rajyasabha : पाच खासदारांची नावे त्यांच्या संमतीशिवाय राघव चड्ढा यांनी निवड समिती घातली?
Raghav Chadha Suspended :
Raghav Chadha Suspended : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajya Sabha News : आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार राघव चढ्ढा यांना आज शुक्रवारी (ता. ११ ) राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. चढ्ढा यांच्या विरुद्ध एका प्रकरणामध्ये चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल येईपर्यंत हा निर्णय लागू असेल. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पीयूष गोयल यांनी मांडला होता, राघव चढ्ढा यांची एक कृती असंसदीय असल्याचा ठपका या प्रस्तावामध्ये सांगण्यात आले होते. त्यानुसार सभापतींनी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Raghav Chadha Suspended :
Delhi Services Bill : दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत; काँग्रेस अन् 'आप'ने खासदारांना बजावला व्हिप

चड्ढा यांच्यावर संसद सदस्यांचा विशेषाधिकाराचा भंग केल्याचा आरोप करत पीयूष गोयल म्हणाले की, 'चड्ढा यांचे वर्तन अनपेक्षित आणि खासदार म्हणून अशोभनीय होते. राघव चढ्ढा यांनी त्यांचे सहकारी सदस्य संजय सिंह यांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.

भाजपचे एस फांगनॉन कोन्याक, नरहरी अमीन आणि सुधांशू त्रिवेदी, आण्णा द्रमुकचे एम थंबीदुराई आणि बीजेडीचे सस्मित पात्रा या पाच खासदारांची नावे त्यांच्या संमतीशिवाय राघव चड्ढा यांनी सभागृहात मांडलेल्या निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात आली. राघव चढ्ढा यांच्यावर खोटे दावा केल्याचा आरोप आहे.

Raghav Chadha Suspended :
Amit Shah Attack On Sharad Pawar : राज्यात सरकार पाडण्याची परंपरा शरद पवारांनी सुरू केली; अमित शाहांचा घणाघात

राघव चढ्ढा यांनी असा बचाव केला :

राघव चढ्ढा यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, "खासदार कोणत्याही समितीच्या स्थापनेसाठी नाव सुचवू शकतो. ज्या व्यक्तिचे नाव प्रस्तावित आहे. त्या व्यक्तिची स्वाक्षरी किंवा लेखी संमती आवश्यक नाही. समजा मी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आणि 10 लोकांना आमंत्रित केले. त्यापैकी आठ येतात, आणि दोन माझे आमंत्रण स्वीकारत नाहीत. त्याऐवजी, त्यांनी माझ्यावर आरोप केला की, तुमच्या वाढदिवसाला आम्हाला आमंत्रित करण्याची तुमची हिंमत कशी झाली? तेच झालं. मी त्यांना (खासदारांना) समितीचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.