T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला, PM मोदींनी सांगितला यशाचा 'मंत्र'; राजकीय नेत्यांकडून अभिनंदन!

PM Narendra Modi  20 World Cup Victory : भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे अभिनंदन करत यशाचा मंत्र सांगितला आहे.
PM Narendra Modi congratulates Team India after their ICC T20 World Cup victory.
PM Narendra Modi congratulates Team India after their ICC T20 World Cup victory.sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा संघाचा पराभव करत भारतीय संघाने इतिहास रचला. घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवणारा आणि सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघच पहिलाच ठरला आहे. राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन करताना खास ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत की, T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकत भारतीय संघाने सिद्ध केले आहे की, दृढ़निश्चिय, संकल्प, संयम आणि आत्मविश्वासचा संगमच यशाचा मुलमंत्र आहे. हा विजय आपल्याला सांगतो की, योग्य दिशेने केलेल्या कठोर परिश्रमामुळे ध्येय साध्य करता येते. नक्की मिळते.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया। यत्नमातिष्ठ धैर्येण ततः सिद्धिर्भवेद् ध्रुवम् ।। या संस्कृत सुभाषीताचा उल्लेख करत सातत्याने धैर्यपूर्वक केलेल्या परिश्रामाने नक्की यश मिळते, असा संदेश देखील दिला आहे.

PM Narendra Modi congratulates Team India after their ICC T20 World Cup victory.
Panchayat Samiti Election : आज निवडले जाणार पंचायत समितीचे सभापती ! कुठे होणार कोणाचा सभापती?

सुनेत्रा पवारांकडून अभिनंदन

विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी देखील अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.

PM Narendra Modi congratulates Team India after their ICC T20 World Cup victory.
NCP Leader Arrested: राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक; तरुणीवर लैंगिक अत्याचार, पक्ष कारवाई करणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com