CM Vijay news : विजय यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडली अन् मंत्र्यांच्या जागेवर बसले! विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं...

Tamil Nadu CM Vijay : विधानसभेतील परंपरा मोडत विजय यांनी मुख्यमंत्र्यांचे खास आसन सोडून मंत्र्यांच्या रांगेत जाऊन बसत नवा पायंडा पाडला; तामिळनाडूच्या राजकारणात या कृतीची जोरदार चर्चा.
CM Vijay Assembly seating
CM Vijay Assembly seatingSarkarnama
Published on
Updated on

CM Vijay Assembly seating : विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर विजय यांची मुख्यमंत्री म्हणूनही लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यांनी सत्तेत आल्यापासून घेतलेले निर्णय, तसेच त्यांची लोकांमधील त्यांचा वापर, संवादाची पध्दत... यामुळे ते सतत चर्चेत असतात. आता विधानसभेतील त्यांच्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

तामिळनाडू विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्‍यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था आहे. विधानसभा अध्यक्षांच्या समोरील बाजूस उजव्या हाताला पहिले आसन मुख्यमंत्र्‍यांचे आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांच्या आसनाच्या डाव्या बाजूला थोडे अंतर सोडून मंत्र्‍यांची आसने आहेत. विधानसभेच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री विधानसभेत आल्यानंतर अध्यक्षांशेजारील आसनावरच बसतात. पण विजय यांनी ही परंपरा गुरूवारी मोडली.

विधानसभेचे दुसऱ्या सत्राचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री विजय सभागृहात आले अन् आपला आसनावर बसले. मात्र, काहीवेळाने ते तिथून उठून शेजारील मंत्र्‍यांच्या आसनावर जाऊन बसले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मुख्यमंत्री कधीही आपले आसन सोडून इतरत्र बसत नाही. विजय यांनी मात्र मंत्र्यांशेजारी जाऊन बसत नवा पायंडा पाडल्याची चर्चा आहे.

CM Vijay Assembly seating
Maharashtra IPS Officers : महाराष्ट्राला मिळाले 12 नवे IPS अधिकारी; उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती

विजय हे मंत्री के. ए. सेंगोटियन यांच्या शेजारी जाऊन बसले होते. त्यांच्याशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुसरे मंत्री अढाव अर्जूना हेही मुख्यमंत्र्‍यांच्या शेजारी बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विधानसभेत दोन मंत्र्‍यांच्या मध्ये बसून चर्चा करणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिल्याच चर्चा तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

CM Vijay Assembly seating
निलंबित महिला IAS अधिकाऱ्याने राज्य सरकारला झुकवले, केंद्राला करावे लागले होते नवे नियम

विधानसभेत आमदार किंवा मंत्री आपले आसन सोडून इतरांच्या आसनावर जाऊन बसतात. हे दृश्य विधानसभेसह लोकसभेतही दिसते. पण मुख्यमंत्री कधीच आपले आसन सोडत नाहीत. विजय यांनी ही परंपरा मोडित काढल्याची चर्चा आहे. सभागृहामध्ये सरकारकडील बाजूला प्रोटोकॉल, पद, ज्येष्ठतेनुसार आसनव्यवस्था केली जाते. त्यांच्या विरुध्द दिशेला विरोधी पक्षाचे सदस्य असतात. तिथेच विशिष्ट निकषानुसार आसनव्यवस्था असते. विरोधी पक्षनेत्यांसाठी निश्चित आसन असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com