Police car chase : थरारक Video! जीवावर उदार होत पोलिस कारच्या छतावर, 40 किलोमीटरचा पाठलाग... अशा आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

Tamil Nadu Police, Velmurugan constable, 40 km police chase, car roof video : आरोपींकडून बंगळूरुहून कोईम्बतूरला सुमारे ३०० किलो गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ नेले जात होते.
Tamil Nadu head constable Velmurugan risked his life by holding onto the roof of a speeding car during a 40-km police chase that led to the arrest of three gutkha smugglers.
Tamil Nadu head constable Velmurugan risked his life by holding onto the roof of a speeding car during a 40-km police chase that led to the arrest of three gutkha smugglers.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Gutkha smuggling news : एखाद्या अॅक्शन चित्रपटला शोभेल अशी एक घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. गुटख्याची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या कारवर जीवावर उदार होत एक पोलीस कर्मचारी उडी घेतो. तब्बल ४० किलोमीटर हा कर्मचारी कारचे छत सोडत नाही. गुन्हेगार कार वेगात दामटतात. पण कर्मचारी मागे हटत नाही. इतर पोलीसही या कारचा पाठलाग करत असतात. अखेर या गुन्हेगारांना चारही बाजूंनी घेरत त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात.

पोलिसांच्या या थरारक कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तामिळनाडूमध्ये हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन यांनी दाखविलेल्या कर्तबगारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोईम्बतूरच्या कोविलपलायम पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची नियमित तपासणी सुरू असताना पोलिसांना एका कारवर संशय आला. कारच्या मागील बाजूला अनेक पोती दिसली. पोलिसांनी ही पोती तपासण्याचा प्रयत्न करताच कारचालक व इतर दोघांनी कारचे दरवाजे बंद करत तिथून पलायन केले.

हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन हे घटनास्थळीच होते. कार तिथून जात असल्याचे पाहताच त्यांनी मागे पुढे न पाहता थेट कारच्या छतावर उडी घेतली. ते छतावर असतानाही आरोपी थांबले नाही. ते वेगाने कार पुढे घेऊन गेले. पोलिसांच्या गाड्याही या कारच्या मागे निघाल्या. मार्गातील इतर पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळाली.

Tamil Nadu head constable Velmurugan risked his life by holding onto the roof of a speeding car during a 40-km police chase that led to the arrest of three gutkha smugglers.
Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमारांनी दिली भाजपकडून लोकसभा तिकीटाची ऑफर; माजी मुख्य सचिवांनी उडवून दिली खळबळ

मार्गातील कनियूर पोलिसांसह काही रुग्णवाहिकाही संशयित कारचा पाठलाग करू लागल्या. सुमारे ४० किलोमीटरच्या पाठलागानंतर ती कार अविनाशी येथील अन्नपूर्णा हॉटेलजवळ पोहचताच पोलीस वाहने आणि रुग्णवाहिकांनी कारला घेरले. रस्ता बंद झाल्याने कार जागेवरच थांबली. तोपर्यंत वेलमुरुगन हे कारच्या छताला घट्ट पकडून होते.

कार थांबल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी जागेवर एकाच्या मुसक्या आवळल्या. तर इतर दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली. त्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली. बाबू धारा, राजेश आणि सुरेश अशी या तिघांची नावे असून ते मुळचे राजस्थानातील आहेत.

Tamil Nadu head constable Velmurugan risked his life by holding onto the roof of a speeding car during a 40-km police chase that led to the arrest of three gutkha smugglers.
SC to OBC demand : आम्हाला अनुसूचित जातीत राहायचं नाही, OBC मध्ये समावेश करा! 'या' समाजाने केली धक्कादायक मागणी

आरोपींकडून बंगळूरुहून कोईम्बतूरला सुमारे ३०० किलो गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ नेले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असून हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोका पत्करून त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी दाखविलेल्या साहसाला लोकांकडून सलाम केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com