TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?

Vijay Thalapathy political entry impact Tamil Nadu : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ होण्याची शक्यता. अण्णाद्रमुकचे 30 आमदार बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे सत्तासंघर्ष तीव्र.
TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?
Published on
Updated on

तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून तामिळनाडूच्या राजकारणात मोठे स्थान मिळवले आहे. मात्र मात्र बहुमतासाठी 118 जागांची गरज असल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम (अण्णाद्रमुक AIADMK) या प्रमुख पक्षात अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. पक्षातील अनेक आमदार टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या बाजूने असल्याचे समजते. त्यामुळे पक्ष दोन गटांत विभागला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते एडप्पाडी के. पलनीस्वामी यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दबाव वाढत आहे.

TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?
Congress Politics : काँग्रेसची पलटी, थेट सत्तेत सहभागी होणार! केरळनंतर या राज्यात होणार फायदा!

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील 47 आमदारांपैकी मोठा गट विजय यांच्या पक्षाला समर्थन देण्याच्या तयारीत आहे. जर लवकर निर्णय झाला नाही, तर 30 पेक्षा जास्त आमदार बंडखोरी करून थेट विजय यांना समर्थन देतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बंडाचे नेतृत्व सी. व्ही. षणमुगम करत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, चेन्नई येथे होणारी एआयएडीएमकेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. ही बैठक रद्द होणे हेच पक्षातील अंतर्गत तणावाचे लक्षण मानले जात आहे. काही नेते किमान 1 वर्षासाठी बाहेरून पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहेत, ज्यामुळे सरकार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?
Election Result : धक्कादायक निकाल : मातब्बर नेत्याचा एका मतानं पराभव; तीनवेळा मतं मोजली, पण झटका बसलाच...

दुसरीकडे, द्रविड मुनेत्र कळगम आघाडीतील पक्षही हालचाली करत आहेत. काँग्रेसने 5 जागा जिंकल्या असून, त्यांच्या नेत्यांकडून विजय यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांनी विजय यांना फोन करून शुभेच्छा दिल्याने संभाव्य सहकार्याचे संकेत मिळाले आहेत.

तसेच, पट्टाली मक्कल कळगम या पक्षाने 4 जागा जिंकल्या असून तेही समर्थनासाठी तयार असल्याचे समजत आहे. पक्षाध्यक्ष अंबुमणि रामदास आणि विजय यांची भेट लवकरच होऊ शकते, अशी चर्चा आहे.

TVK Vijay government : तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता! 30 आमदारांची बंडाची तयारी? अण्णाद्रमुकमध्ये सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू?
Cyber Police Suspension : सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह 9 जण तडकाफडकी निलंबित, पोलिस दलात खळबळ, नक्की काय घडलं?

एकूणच, सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत नाजूक आणि निर्णायक टप्प्यावर आहे. एआयएडीएमकेने बाहेरून पाठिंबा दिल्यास विजय सहज बहुमत मिळवू शकतात. मात्र पक्षातील बंडखोरी वाढल्यास तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com