Tej Pratap Yadav FIR : ‘मला अन् लालूंना मारण्याचा कट’; तेज प्रताप यादवांचा गंभीर आरोपांनी खळबळ, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

Tej Pratap Yadav files FIR alleging a conspiracy kill him and Lalu Prasad Yadav, triggering a fresh political storm in Bihar : तेज प्रताप यादव यांच्या तक्रारीत अनुष्का यादव हिचा समावेश, आधी रिलेशनशिप पोस्ट, नंतर अकाउंट हॅकचा दावा, बिहारच्या राजकारणात घराणेशाहीत नवा वाद पेटला आहे.
Tej Pratap Yadav FIR
Tej Pratap Yadav FIRSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. तेज प्रताप यादव यांनी स्वतःला आणि वडील लालू प्रसाद यादव यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणात त्यांनी माजी सहकारी आकाश यादव, अनुष्का यादव आणि अन्य सहा जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून सचिवालय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी दावा केला की, काही लोक त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असा आरोप केला की, केवळ त्यांनाच नव्हे तर आजारी असलेल्या त्यांच्या वडिलांनाही लक्ष्य केलं जात आहे. मला आणि माझ्या वडिलांना मारण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला, असे तेजप्रताप यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणानंतर तेज प्रताप यांनी बिहार (Bihar) सरकारकडे स्वतःच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करत या प्रकरणामागे मोठे राजकीय षडयंत्र असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली. विरोधकांशी हातमिळवणी करून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

Tej Pratap Yadav FIR
CJP Movement Controversy : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सोशल मीडियावर काय होतीय टीका

या प्रकरणातील सर्वात चर्चेची बाब म्हणजे ‘एफआयआर’मध्ये अनुष्का यादव यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी तेजप्रताप यादव यांनी दुसऱ्या महिलेशी विवाह झालेला असतानाही अनुष्का यादव यांच्याशी संबंध असल्याचा दावा सोशल मीडियावर केला होता. या वादग्रस्त पोस्टनंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलमधून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र नंतर तेजप्रताप यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा दावा करत संबंधित पोस्ट हटवली होती.

Tej Pratap Yadav FIR
CJP Political Analysis : हिंदू-मुस्लिममध्ये अडकवले, किती जणांना नोकरी मिळाली? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं काय साधलं?

दरम्यान, या तक्रारीपूर्वी आकाश यादव यांनीही पाटलीपुत्र पोलिस ठाण्यात तेज प्रताप यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आकाश यादव यांनी आरोप केला होता की, तेजप्रताप आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तेज प्रताप यादव यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. याचदरम्यान आकाश यादव यांनी अमेरिकेतील एका क्रमांकावरून आलेल्या फोनद्वारे एका तुरुंगात असलेल्या गँगस्टरशी संबंध असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळाले आहे. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. बिहारच्या राजकारणातील हा वाद आता नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com