Tejashwi Yadav
Tejashwi yadavsarkarnama

Tejashwi Yadav : कुटुंब फुटूनही तेजस्वीच उत्तराधिकारी : लालूप्रसाद यादवांकडून तोंडभरुन कौतुक, दिली महत्वाची जबाबदारी

Tejashwi Yadav Confirmed as Leader of Opposition in Bihar : बिहार विधानसभाेत तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड आरजेडीकडून अधिकृतरित्या जाहीर. बिहार राजकारणातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Published on

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने जोरदार कामगिरी करत मोठी आघाडी घेतली. भाजपने घौडदौड करत विजयाचे लक्ष्य पार केले. दुसरीकडे महागठबंधनला अपेक्षेपेक्षा मोठा धक्का बसला असून त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या राजकीय पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

'राजेडी'चे युवा नेते तेजस्वी यादव हे पुढील काळातही विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणार आहेत. स्वतः पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केली असून आगामी राजकीय धोरणेही तेजस्वी यांच्या मार्गदर्शनाखालीच ठरवली जाणार आहेत.

पटणामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मीसा भारती, माजी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची सविस्तर चर्चा करण्यात आली. लालू प्रसाद यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की ''तेजस्वी यांनी पक्षाला पुढे नेले आहे आणि पुढेही 'राजेडी'चे महत्त्वाचे निर्णय तेच घेतील."

Tejashwi Yadav
Post Office Scheme : 'पैसा सुरक्षित, नफा जबरदस्त!', पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम देणार 2 लाखांचे व्याज; आजच करा अर्ज!

सुमारे चार तास चाललेल्या या चर्चेमध्ये तेजस्वी यादव यांनी विजयी आणि पराभूत उमेदवारांशी संवाद साधला. निवडणूक निकालांचा तपशीलवार आढावा घेतला गेला. यावेळी निकाल कोर्टात नेण्याचा पर्यायही चर्चेत आला असून महागठबंधनच्या इतर नेत्यांशी चर्चा करून यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com