Farmhouse CM : सत्ता गेली तरी सुटेना फार्महाऊस; नव्या आमदारांची पहिली हजेरीही तिथेच

K. Chandrashekar Rao : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता तो, ‘फार्महाऊस मुख्यमंत्री’.
K. Chandrashekar Rao
K. Chandrashekar RaoSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात ‘फार्महाऊस मुख्यमंत्री’ म्हणून टीकेचे धनी झालेले तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना सत्ता गमवावी लागली. पण त्यानंतरही त्यांना फार्महाऊसचा मोह काही सुटेना. पराभवानंतर भारत राष्ट्र समितीच्या निवडून आलेल्या आमदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक केसीआर यांनी याच फार्महाऊसवर घेतल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

तेलंगणामध्ये केसीआर (K. Chandrashekar Rao) यांची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात काँग्रेसला (Congress) यश मिळाले. काँग्रेसला ६४ तर बीआरएसला (BRS) केवळ ३९ जागा मिळाल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेससह भाजपकडून केसीआर यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता तो, ‘फार्महाऊस मुख्यमंत्री’.

K. Chandrashekar Rao
INDIA Alliance : मोदी है तो मुमकिन है! इंडिया आघाडीतील खासदारानेच दिला नारा

केसीआर यांचे फार्महाऊस हैद्राबादपासून ६५ किलोमीटर अंतरावरील इरावेल्ली गावात आहे. आपण शेतकरी असल्याचे ते सातत्याने सांगतात. त्यामुळे फार्महाऊसवर सातत्याने जात असल्याचे नेत्यांकडून सांगितले जाते. ते मंत्री, आमदारांनाही इथेच भेटत. पण आमदारांसह सर्वसामान्य नागरिकांना सहजासहजी भेटता येत नव्हते.  मंत्रालयापेक्षा ते फार्महाऊसवर जास्त वेळ घालवत असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह स्थानिक नेत्यांकडून फार्महाऊस मुख्यमंत्री अशी टीका केसीआर यांच्यावर करण्यात आली. फार्महाऊस मुख्यमंत्र्यांना आता फार्महाऊसवरच पाठवा, असे आवाहन या नेत्यांकडून केले जात होते. प्रचारात हा मुद्दा चांगलाच गाजला.

निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतरही केसीआर यांना काही फार्महाऊस सुटलेले नाही. त्यांनी सोमवारी रात्री निवडून आलेल्या आमदारांची पहिली बैठकही याच फार्महाऊसवर घेतली. तिथे आमदारांना शुभेच्छा देत पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते. रविवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यपालांना राजीनाम्याचे पत्र पाठवून केसीआर यांनी खासगी कारने फार्महाऊस गाठले होते. त्यामुळे हे फार्महाऊस पुन्हा चर्चेत आले आहे.

(Edited By - Rajanand More)

K. Chandrashekar Rao
Rajasthan Politics : वसुंधराराजे अन् गेहलोत यांचे बुरुज ढासळले; 'होम पिच'वर ओढवली नामुष्की...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com