Telangana Politics : निवडणुकीत रंगत; वायएसआर तेलंगणाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने चित्र बदलणार, टीडीपीच्या भूमिकेकडे लक्ष

Congress News : तेलंगणातील विधानसभा निवडणूक आता रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
YSR Telangana
YSR TelanganaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Telngana Election : आगामी काळात होत असलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पहिले जात आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणूक आता रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. वायएसआर तेलंगणा पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यासोबतच चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने अजून पत्ते न उघडल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून आहे.

येत्या ३० नोव्हेंबरला तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्षांनी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या बीआरएसला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे बीआरएस पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच आता वायएसआर तेलंगणा पक्षाने विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला (Congress) पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत त्यांचे पारडे जड झाले आहे.

YSR Telangana
Kangana Ranaut News : दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवल्यानंतर कंगना आता लोकसभेच्या मैदानात उतरणार ? दिले मोठे संकेत

वायएसआर तेलंगणा पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाच्या अध्यक्षा वाय. एस. शर्मिला यांनी जाहीर केले असून, येत्या काळात सत्ता परिवर्तनाची शक्यता असल्यामुळे सरकारविरोधी मताचे विभाजन करायचे नसल्याने अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असल्याचे शर्मिला यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात तेलंगणामध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या तेलुगू देशम पक्षाने यापूर्वी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, मध्यंतरी त्यांना अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पक्ष कोणाला पाठिंबा देणार ? यावर तेलंगणातील बरेच गणिते अवलंबून असणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Edited by Amol Jaybhaye

YSR Telangana
Rajasthan Election 2023 : 'मी कुठेही जात नाही' म्हणत वसुंधरा राजेंनी भरला हुंकार : उमेदवारी अर्ज दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.