The Accidental Cockroach Party Movie: आता रुपेरी पडद्यावर उलगडणार 'कॉकरोच'ची कहाणी! अभिजीत दिपकेंच्या भूमिकेत कोण?

CJP Protest Story Comes to the Big Screen: NEET पेपरफुटी आंदोलनावर आधारित 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' चित्रपटाची घोषणा. अभिजीत दिपकेंची भूमिका कोण साकारणार, 2027 रिलीजची चर्चा.
The Accidental Cockroach Party  movie
The Accidental Cockroach Party movieAI
Published on
Updated on

Cockroach Janta Party News: दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP)च्या आंदोलनाने देशाचे राजकारण आणि शिक्षण व्यवस्था चांगलीच ढवळून निघाली आहे. नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाची चर्चा इतकी रंगली की, त्यावरील कथा आता थेट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

या चित्रपटाचे नाव 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) असे ठेवण्यात आले आहे. या शीर्षकाचीच सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे. नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी निर्मात्यांच्या मते हा चित्रपट केवळ राजकीय व्यंगचित्र नसून आंदोलनामागील घडामोडी, नियोजन आणि त्या काळातील वातावरण यांची मनोरंजक मांडणी करणार आहे.

चित्रपटात आंदोलन कसे आकाराला आले, पडद्यामागे कोणत्या हालचाली घडल्या आणि काही निर्णयांमागील राजकीय समीकरणे काय होती, याची सिनेमॅटिक मांडणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ घोषणाबाजीपुरता मर्यादित न राहता, राजकीय नाट्य आणि व्यंग यांचा संगम ठरेल, अशी चर्चा आहे.

The Accidental Cockroach Party  movie
Paper Leak Bill passed: NEET परीक्षा अन् स्पर्धा परीक्षांसाठी मोठी बातमी! Anti Paper Leak Bill ला राज्यसभेचीही मंजुरी

जयपूरचे संशोधक आणि लेखक गोविंद देव ब्रह्म यांनी या विषयावर सखोल अभ्यास आणि पटकथा तयार केल्यानंतर या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात आंदोलनाशी संबंधित काही कमी परिचित आणि पडद्यामागील घटनांनाही स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे राजकारण, व्यंग आणि वास्तव यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

The Accidental Cockroach Party  movie
LPG News Rules: 1 ऑगस्टपासून LPG चे नियम बदलणार! OTP, सबसिडी, बुकिंग ते PNG; जाणून घ्या काय बदलणार

द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला?

'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' या बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मितीला वेग आला असून, सध्या प्री-प्रॉडक्शनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याची माहिती समोर येत आहे. पटकथा अंतिम करण्याबरोबरच चित्रिकरणासाठी विविध लोकेशन्सची पाहणी सुरू असून, संपूर्ण प्रकल्पावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे समजते.

The Accidental Cockroach Party  movie
ED Raid: दरवाजा बंद होताच शिडीवरून घरात घुसले ED अधिकारी; 600 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश, ईडीची सर्वात मोठी कारवाई!

मुंबईत दिग्दर्शक, प्रमुख कलाकार आणि सह-निर्मात्यांच्या निवडीबाबत महत्त्वाच्या बैठका सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, चित्रपटाशी संबंधित कोणत्याही अभिनेता, अभिनेत्री किंवा दिग्दर्शकाच्या नावावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्टारकास्टबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची अधिकृत रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, आंदोलनात चर्चेत राहिलेले अभिजीत दिपके आणि इतर प्रमुख आंदोलकांच्या भूमिका नेमके कोण साकारणार, याबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com