INDIA Alliance : एकेकाळी भाजपसोबत असलेले एनडीएचे 'हे' दोन पक्ष होणार 'इंडिया'चे मित्र ?

INDIA Alliance Meeting in Mumbai : मुंबईतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
INDIA Alliance Meeting in Mumbai :
INDIA Alliance Meeting in Mumbai : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपविरोधी इंडिया आघाडीची तिसरी बैठक राजधानी मुंबईत पार पडत आहे. आघाडीची ताकद वाढवण्यासाठी विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पाटण्यातील पहिल्या बैठकीत एकूण 18 पक्षांचा सहभाग होता. बंगळुरूमधील दुसऱ्या बैठकीत हाच आकडा 26 पक्षांवर गेला. आता इंडिया आघाडी आपला विस्तार करत असतानाच एकेकाळी भाजपसोबत असलेल्या पक्षांनाही सोबत घेण्याच्या तयारीत आघाडी दिसत आहे.

पंजाबमधील अकाली दल आणि इंडियन नॅशनल लोकदलला निमंत्रण -

एकेकाळी भाजपसोबत असलेल्या पंजाबमधील अकाली दल आणि हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (INLD) या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आघाडीने केला आहे. नितीश कुमार यांनी अकाली दल आणि आयएनएलडीशी संपर्क साधून त्यांना मुंबईतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

आयएनएलडी आणि अकाली दल या दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. याचे कारण म्हणजे ओमप्रकाश चौटाला आणि बादल कुटुंबात राजकारणापलीकडची जवळीक आहे. अशा परिस्थितीत अकाली दल आणि आयएनएलडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष यापूर्वीही एकत्रितपणे एनडीएचा भाग राहिले होते.

INDIA Alliance Meeting in Mumbai :
Wadettiwar on Government : तिन्ही इंजीन एकमेकांना धक्के मारत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणली ‘ही’ योजना !

एवढेच नाही तर हरियाणामध्येही आयएनएलडीची ताकद दाखवण्याची तयारी सुरू आहे. 25 सप्टेंबर रोजी चौटाला यांचे वडील आणि माजी उपपंतप्रधान देवी लाल यांची जयंती आहे. यानिमित्ताने कैथल जिल्ह्यात मोठ्या कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत.

नितीश कुमार यांनी यापूर्वीही सांगितले होते की, मुंबईच्या बैठकीत आणखी काही पक्ष आमच्यासोबत असतील. दरम्यान, शेतकरी आंदोलनात अकाली दल भाजपपासून वेगळा झाला होता. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीतही या दोघांमध्ये ऐक्य नव्हते. अकाली दलाने बसपासोबत युती करून निवडणूक लढवली, पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. सुखबीरसिंग बादल आणि प्रकाशसिंग बादल यांसारख्या नेत्यांचाही पराभव घडून आला. अशा स्थितीत अकाली दल या पक्षालाही राजकीय साथीदाराची गरज आहे. मात्र हे समीकरण जुळून येईल का? हे पाहावे लागेल.

INDIA Alliance Meeting in Mumbai :
India Meeting News : राहुल गांधी वडापाव खाणार, ममतादीदी पुरणपोळीची चव चाखणार, नितीश-लालूंची जोडी बाकरवडी संपवणार..

अकाली दलसमोर तिढा -

पंजाबमध्ये अकाली दल यांची लढाई काँग्रेसशी होती आणि आता आम आदमी पक्ष राज्यात सत्तेत आहे. दोघेही इंडिया आघाडीत आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये अकाली दलचा 'इंडिया' प्रवेश होईल का? झाला तर याचा काय परिणाम होईल आणि जागावाटप कसे होईल? यावर चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com