त्यांना भयंकर मोठी किंमत चुकवावी लागेल : नरेंद्र मोदीं

.
त्यांना भयंकर मोठी किंमत चुकवावी लागेल :  नरेंद्र मोदीं

नवी दिल्ली: 'पुलवामामध्ये  दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्याना भयंकर मोठी किंमत चुकवावी लागेल . सैनिकांच्या शौर्यावर पूर्ण विश्‍वास आहे'', असा इशारा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे . 

 रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या 'वंदे भारत' या नव्या वेगवान रेल्वेगाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन केले. त्याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, " मी देशाला ग्वाही देतो की हल्ल्यामागचे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल.या संवेदनशील आणि भावूक प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही राजकीय चिखलफेकीपासून दूर राहावे. देश एकजुटीने हल्ल्याचा मुकाबला करतो आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. हाच ऐक्‍याचा सूर जगासमोर जावा. आपण ही लढाई जिंकण्यासाठी लढतो आहोत." 

" भिकेचे डोहाळे लागलेल्या शेजारी देशाला वाटते आहे की अशा हल्ल्यातून भारताला अस्थिर करता येईल. मात्र हे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही. या मार्गाने जे कोणी गेले ते बरबाद झाल्याचे काळाने सिद्ध केले आहे. या हलल्ल्यास 130 कोटी हिंदुस्थानी सडेतोड उत्तर देतील", असा टोला  मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com