

TMC News : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक तब्बल 92 टक्के मतदान झाले आहे. या मतदानानंतर आता कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे. अनेक सर्व्हेमध्ये भाजप सत्ता स्थापन करत असल्याचे दिसून येत आहे. तर, काही सर्व्हेमध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर दाखवत आहे. चार मे रोजी येथील निकाल जाहीर होणार आहे. भाजपकडून विजयाचा दावा केला जात असताना टीएमसीच्या अंतर्गत सर्व्हेने भाजपचे टेन्शन वाढले आहे.
‘The Wall’ च्या रिपोर्टनुसार टीएमसीने आपल्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांकडून या निवडणुकीच्या मतदानानंतर अंदाज घेतला आहे. या अंदाजानुसार टीएमसीचे विजयाचे गणित पक्के झाले आहे.
टीएमसीची कामगिरी खालवली तरी टीएमसी 174 जागांच्या खाली येणार नाही. कारण जमीनस्तरवार कोणतीही सत्ताविरोधी लाट नव्हती. तसेच अंतर्गत सर्व्हेमध्ये विश्वास व्यक्त करण्यात आला आहे की, टीएमसीचे सरकार दोन-तृतीयांश बहुमतासह सत्तेत येईल.
The Wall च्या रिपोर्टनुसार टीएमसीच्या सुत्रांनी त्यांना सांगितले की, टीएमसीने 294 जागांचे सखोल विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार केवळ 43 जागा या ग्रे झोनमध्ये आहेत. तेथे भाजप किंवा टीएमसी जिंकण्याचे प्रमाण 50:50 आहे. म्हणजे वातावरण थोडे जरी अनुकूल असेल तरी टीएमसी येथे बाजी मारू शकेल. या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला 70 चा आकडा गाठणे देखील मुश्कील दिसत आहे. जास्तीत जास्त ते 71 पर्यंत मजल मारु शकतात,असा अंदाज टीएमसीच्या अंतर्गत रिपोर्टमध्ये व्यक्त केला जात आहे.
टीएमसीच्या अंतर्गत सुत्रांनी म्हणणे आहे की, भाजपने ध्रुवीकरण करण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायलेंट व्होटरने त्यांना गेम फिरवला आहे. महिला, मुस्लिम मतदारांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भरभरून मतदान केले आहे. लक्ष्मी भांडर सारख्या महिलांना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांमध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणात टीएमसीला मतदान झाले आहे. तसेच भाजप अजुनही शहरी भागात आपली पकड मजबुत करू शकली नाही.त्यांना ग्रामीण भागातच यश मिळेल मात्र, शहरी भागात त्यांना यश मिळणार नसल्याचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.