

Amit Shah : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान झाले आहे. ऐतिहासिक तब्बल 92 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढलेल्या मतदानानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवत आहोत, असा दावा केला आहे.
अमित शाह म्हणाले, मला मिळालेल्या फिडबॅक प्रमाणे राज्यातील जनतेने पहिल्याच टप्प्यातील निवडणुकीत आपले नशिष निश्चित केले आहे. बंगालमध्ये भाजप सरकार बनवत असून 152 जागांपैकी आम्ही 110 जागा जिंकत आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मतदारांनी रिकॉर्ड ब्रेक मतदाना हे बदलासाठी केले आहे. बंगालमधून “आतंक राज”चा शेवट होत असून महिलांची सुरक्षा ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता असणार आहे. कालचे मतदान हे शांतीपूर्ण पद्धतीने झाले. यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही. 30 नागरिक जखमी झाले आहेत.
भाजपला 2021 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 77 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे त्यातील 59 जागा या आत्ता होत असलेल्या पहिल्या निवडणुकीच्या टप्प्यातील जागांवर मिळाल्या होत्या. त्यामुळे या भागामध्ये भाजपचा आलेख वाढता राहिला आहे. 2011 मध्ये या भागात भाजपने एकही जागेवर विजय मिळवला नव्हता. मात्र. 2016 मध्ये हा आकडा तीन पर्यंत पोहोचला. आणि 2021 मध्ये 59 जागांवर विजय मिळवत सर्वांना आश्चर्य चकीत केले. त्यामुळे भाजपचा या भागातील वाढता प्रभाव पाहाता त्यांच्या जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 152 जागांवर मतदान झाले. त्यामध्ये मुर्शीदाबाद या मुस्लिम बहुल जिल्ह्याचा समावेश आहे. येथे 93 टक्के मतदान झाले येथे 22 विधानसभेच्या जागा आहेत. मुस्लिम लोकसंख्या 65 टक्क्याहून या भागात आहे. या भागात टीसीएमसीचे वर्चस्व राहिले आहे. येथे भाजपला फारशी संधी दिसून येत नाही. तर, कूचबिहार जिल्ह्यात 94 टक्के मतदान झाले आहे. येथे भाजपचा चांगला पाठींबा आहे. त्यामुळे भाजप-टीसीएमसीमध्ये काटे की टक्कर दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.