PM Modi on Trump Attack : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने PM मोदीही हादरले; काही मिनिटांतच दिली कडक शब्दात प्रतिक्रीया

Narendra Modi reaction on Trump Attack : सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर'मधील मोठा अनर्थ टळला असून ट्रम्प यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. तसंच गोळबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख देखील पटली आहे. कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Trump Attack News | Modi Reaction | White House Shooting
Donald Trump escorted by security after shooting at White House Correspondents Dinner as Narendra Modi condemns the attack.Sarkarnama
Published on
Updated on

Donald Trump Attack News : वॉशिंग्टन येथील 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर'मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असतानाच झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली त्यावेळी या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी वान्स उपस्थित होते.

सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर'मधील मोठा अनर्थ टळला असून ट्रम्प यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. तसंच गोळबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख देखील पटली आहे. कोल टॉमस ॲलन असं या हल्लेखोराचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदींनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'वॉशिंग्टन डीसी मधील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, प्रथम महिला आणि उपराष्ट्रपती सुरक्षित आणि सुखरूप आहेत, हे समजल्यानंतर समाधान वाटलं.

Trump Attack News | Modi Reaction | White House Shooting
Donald Trump Shooting : जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; थेट व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबार

त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही आणि अशा हिंसेचा निषेधच केलाच पाहिजे.', अशा शब्दात मोदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Trump Attack News | Modi Reaction | White House Shooting
Amol Mitkar : अजितदादांचा अपघात झाला तिथे दिवाबत्ती करायला गेलेल्या लोकांना काल काय दिसलं? अमोल मिटकरींनी शेअर केले भयानक फोटो

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन येथे 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डट्स डिनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. याशिवाय अनेक पत्रकार आणि पाहुणे या कार्यक्रमासाठी आले होते. अशात एका व्यक्तीने इथे गोळीबार झाला. गोळीबार होताच ट्रम्प यांना सुरक्षारक्षकांनी सुखरुप बाहेर नेलं. दरम्यान, शुटरला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, "आज संध्याकाळी डीसीमध्ये खूप धावपळ घडली. सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी उत्कृष्ट काम केल्याच पाहिला मिळालं. गोळीबारा दरम्यान त्यांनी मोठे शौर्य आणि चपळाई दाखवली.

गोळीबार करणाऱ्याला पकडण्यात आलं आहे. मी कार्यक्रम सुरू ठेवण्याची विनंती केली होती, पण पुढील निर्णय पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांच्या निर्णयावर अवलंबून असतो. मात्र, आजची संध्याकाळ अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि आम्हाला तो कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा लागेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com