US Iran Ceasefire : अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एका अटीवर शस्त्रसंधीची घोषणा

Donald Trump ceasefire announcement : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तुर्तास थांबला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अखेर आपण सध्या हल्ले करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
Mojtaba Khamenei, Donald trump
Mojtaba Khamenei, Donald trump US Iran Ceasefire Sarkarnama
Published on
Updated on

US Iran Ceasefire : संपूर्ण इराणला रात्रीत उद्ध्वस्त करण्याचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्तास इराणवर लष्करी कारवाई न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कारवाई केवळ पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित केल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

त्यामुळे दोन आठवडे का होईना पण इराणवरील संकट टळल्यामुळे संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाई थांबविण्यास तयार आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे.

Mojtaba Khamenei, Donald trump
Unseasonal Rain Relief : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारचा मोठा निर्णय! आर्थिक मदत जाहीर

परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी अशी आमची अट आहे. आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्यापुढे गेलो आहे. आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत.

मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने आणि मध्यपूर्वेतील देशांचे प्रतिनिधीत्व करताना, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे, असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Mojtaba Khamenei, Donald trump
Manipur violence news : मोठी बातमी : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्याने खळबळ, सरकारने घेतला मोठा निर्णय

शिवाय ट्रम्प यांच्या या घोषणेला इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. अराघची यांनी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानची भूमिका निर्णायक राहिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com