TCS Case: निदा खानच्या अटकेसाठी पोलिसांनी टाकलं होतं जाळं; फिल्मी स्टाईलनं मारली रेड! वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी

Nashik TCS Case Nida Khan: नाशिकच्या कथित TCS धर्मांतर प्रकरणातील फरार असलेली आरोपी निदा खान हीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पण तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनिय मोहिम राबवली.
Nida Khan
Nida KhanSarkarnama
Published on
Updated on

Nashik TCS Case Nida Khan: नाशिकच्या कथित TCS धर्मांतर प्रकरणातील फरार असलेली आरोपी निदा खान हीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पण तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनिय मोहिम राबवली. अटकेपासून बचावासाठी ती सातत्यानं आपली ठिकाणं बदलत होती, पण अखेर तिला छत्रपती संभाजी नगरच्या नरेगाव भागातून पोलिसांनी तिला अटक केली. २० पेक्षा अधिक पोलीस साध्या कपड्यात अनेक दिवसांपासून या भागात रेकी करत होते. जाणून घेऊयात या मोहिमेची इनसाईड स्टोरी.

Nida Khan
Praveen Tarde : ‘नसरापूर घटनेसारख्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी सिनेमा काढेन, ते पाहून कोणाचेही धाडस होणार नाही’

निदा खान कुठे लपली होती?

नाशिकच्या TCS या आयटी कंपनीमध्ये घडलेल्या जबरदस्तीच्या धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान ही अद्याप फरार होती. पोलिसांकडून सातत्यानं तिचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येकवेळी ती अटकेपासून स्वतःला वाचवत होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक महत्वाची सूचना मिळाली, त्यानुसार निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नरेगांव येथील कैसर कॉलनीतील एका भाड्याच्या घरात लपून बसली होती.

Nida Khan
RTE admission bribery case : RTE प्रवेशासाठी ‘रेटकार्ड’! 50 हजारांची लाच मागणारे दोन कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

पोलिसांनी निदाचं लोकेशन कसं ट्रॅक केलं?

सुत्रांच्या माहितीनुसार, ती गेल्या तीन-चार दिवसांपासून याच फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्यासोबत तिचे वडील, आई, भाऊ आणि मावशी देखील इथं राहत होते. पोलिसांनी या सर्वांची खबर मिळाली होती, पण ठोस पुराव्यांशिवाय पोलीस कोणतीही कारवाई करु इच्छित नव्हते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि इतर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली निदा खान याच ठिकाणी राहत असल्याचं स्पष्ट झालं.

Nida Khan
Nashik TCS Case : TCS धर्मांतर प्रकरणात पहिलं राजकीय कनेक्शन उघड ; निदा खानला आश्रय देणारा MIM नगरसेवक पोलिसांच्या रडारवर

पोलिसांनी कशी चालवली मोहिम?

अत्यंत गुप्तरित्या ही मोहीम राबवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. त्यासाठी २० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना या भागात आणि तिच्या फ्लॅटच्या आजुबाजुला तैनात करण्यात आलं. पण यासाठी सर्वजण पोलिसांच्या वेशात नव्हे तर साध्या वेशात होते. सर्व अधिकारी आणि कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणं या भागात फिरत होते. इतकचं नव्हे तर पोलिसांनी सरकारी गाड्या आणि जीपचा वापरही करणं टाळलं, कारण स्थानिकांना कुठल्याही गोष्टीचा संशय येऊ नये.

सुमारे तीन ते चार दिवसांपर्यंत पोलीस सातत्यानं या भागात रेकी करत होते. अधिकाऱ्यांना ही देखील माहिती मिळाली होती की, निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये काही वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेत होती. त्याचबरोबर हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या ती प्रयत्नात होती. पोलिसांना या गोष्टीची अडचण होती की, जर तिला कोर्टाकडून दिलासा मिळाला तर तिची अटक अवघड होऊ शकते. याच कारणासाठी पोलिसांनी योग्य वेळाची वाट पाहिली, आणि त्यानंतर अचानक छापेमारी करुन तिला ताब्यात घेतलं.

Nida Khan
Mukul Wasnik news : केरळमध्ये कोण मुख्यमंत्री? मुकुल वासनिक यांच्या हातातील यादी व्हायरल

निदा खानला केव्हा झाली अटक?

अटकेनंतर गुरुवारी रात्री उशीरा निदा खानला सुतगिरणी चौकाजवळ न्यायिक अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानी हजर करण्यात आलं. यानंतर नाशिक पोलिसांनी ट्रान्जिट रिमांड घेतली. त्यानंतर विशेष वाहनानं तिला पुढच्या तपासणीसाठी नाशिकला नेण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार, अटकेवेळी तिच्यासोबत इतर पाच जण उपस्थित होते.

प्रकरण काय?

पोलिसांच्या चौकशीत हे समोर आलं की, कथितरित्या निदा खान हीनं आत्तापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी प्रयत्न करत होती. तिनं काही लोकांना इस्लामिक धार्मिक साहित्य, पुस्तक आणि व्हिडिओ पाठवले होते. तपास यंत्रणांना हा संशय आहे की ती एका संघटित गुन्ह्याचा भाग असू शकते. यामध्ये टीसीएस कंपनीतील काही अन्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com