Mlc Disqualified : विधान परिषदमध्ये जिंकताच भाजपमध्ये प्रवेश, दोघांची आमदारकी जाणार; मोठ्या नेत्याने कायदाच सांगितला

Rahul Raj Banshidhar Brajwasi Join BJP : विजयानंतर अवघ्या 48 तासात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन आमदारा अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या अपात्रतेसंदर्भातील कायदाच विरोधी पक्षनेत्यांनी सांगितला.
newly elected MLCs be disqualified after joining the BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Tejashwi Yadav : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये विजयी झालेल्या दोन आमदारांनी विजयानंतर अवघ्या 48 तासांमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

बिहारमध्ये शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले राहुल राज आणि पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले बंशीधर ब्रजवासी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आता त्यांची थेट आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा हवाला देत हे दोघेही अपात्र कसे ठरतात हे सांगितले आहे. ते म्हणाले की, अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणे हे भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसुचितील पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरतात.

पुढे ते म्हणाले की, दहाव्या अनुसूचितील पॅरा 2(2) नुसार, राजकीय पक्षाकडून उमेदवार नसताना म्हणजे अपक्ष म्हणून विजयी होत असेल तर त्याला विजयानंतर तो कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करत असेल तर तो विधान परिषद, विधानसभेचा सदस्य म्हणून अपात्र ठरतो.

संविधानच्या कलम 191(2) नुसार, दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्र घोषित केलेला व्यक्ती राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असते, असे देखील त्यांनी सांगितले.

newly elected MLCs be disqualified after joining the BJP
MLC Election : नागपूरमध्ये भाजपला पक्षातूनच दगाफटका? 8500 मतपत्रिकांवरील ‘2’च्या घोळामुळे संशय; बावनकुळेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली!

अपात्रतेबाबत सभापतींना अधिकार

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दहाव्या अनुसूचीमधील पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार सदस्याच्या अपात्रेविषयी निर्णय घेण्याचा अधिकारी हा सभागृहात सभापतींना असतो. दरम्यान, अपक्ष म्हणून विजयी झालेलेबंशीधर ब्रजवासी आणि डॉ. राहुल राज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे संविधानाच्या दहाव्या अनुसूचितील कलमानुसार त्यांना अपात्र घोषित केले जाणे निश्चित आहे.

newly elected MLCs be disqualified after joining the BJP
BJP Politics : विधानपरिषद निवडणूक जिंकलेल्या दोन आमदारांचा 48 तासांत भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या डावाने विरोधकाच्या गोटात खळबळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.