Pakistan espionage Case : देशाच्या सुरक्षेला तडा! नौदलाची गुप्त माहिती पाकिस्तानला, सोशल मीडियातून देवाणघेवाण उघड; गुप्तचर यंत्रणांसह पोलिसांची मोठी कारवाई

Indian Navy Pakistan espionage Case : देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिशय गंभीर प्रकरणात आणखी एकास अटक झाली असून या प्रकरणातील अटकेची संख्या आता चारवर पोहोचली आहे.
Pakistan espionage Case
Pakistan espionage Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भारतीय नौदलाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या प्रकरणात उडुपी पोलिसांनी चौथ्या आरोपीला अटक केली आहे.

  2. ही माहिती फेसबुक पेजद्वारे देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले असून संबंधित पेजचा मालक अद्याप फरार आहे.

  3. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने तपास सुरू असून प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात आहे.

Bangalore News : देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिशय गंभीर प्रकरणात उडुपी पोलिसांनी महत्त्वाचे यश मिळवले आहे. भारतीय नौदलाची अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील अटकेची संख्या आता चारवर पोहोचली आहे. तर या माहितीची देवाण-घेवाण फेसबुक पेजद्वारे झाल्याचे उघड झाले असून वापरल्या गेलेल्या फेसबुक पेजचा मालक अद्याप फरार आहे. उडुपी पोलिसांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने तपास सुरू ठेवला आहे.

अटक केलेल्या आरोपीची ओळख पश्चिम बंगालमधील आलिफ इस्लाम (वय २१) अशी आहे. तो सध्या केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मरायूर येथे वास्तव्यास होता. तेथूनच तो नौदलासंबंधित गुप्त माहिती परदेशात पाठवण्याच्या कारवायांमध्ये सहभागी होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

शिपयार्डमधील कर्मचाऱ्यांकडूनच माहितीची ‘लीक’

पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणाची मुळे मालपे आणि कोचीन शिपयार्ड येथील काही कर्मचाऱ्यांच्या हालचालींशी संबंधित आहेत. या शिपयार्डमध्ये कार्यरत असलेल्या काही व्यक्तींनी भारतीय नौदलाशी संबंधित अतिसंवेदनशील माहिती गुप्तपणे पाकिस्तानला पाठवल्याचे समोर आले आहे.

Pakistan espionage Case
Pakistan espionage case : पाकिस्तानसाठी हेरगिरी, ठाण्यातील अभियंत्याला अटक; नौदलातील प्रतिबंधित नौकांची माहिती पुरवल्याचा संशय

आरोपींनी भारतीय नौदलाच्या जहाजांचे क्रमांक, तसेच त्यांची गोपनीय यादी मिळवून ती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. ही माहिती व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

२०२५ मधील महत्त्वाच्या अटक

या प्रकरणाचा तपास २०२५ च्या अखेरीस सुरू झाला. डिसेंबर २०२५ मध्ये गुजरातमधील हिरेंद्रकुमार याला अटक केली होती. त्याआधी नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील रोहित आणि संत्री या दोघांना अटक केली होती. आलिफ इस्लाम हा या जाळ्यातील महत्त्वाचा दुवा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

फेसबुक पेजद्वारे माहितीची देवाण-घेवाण

गोपनीय माहिती पाठवण्यासाठी वापरल्या गेलेल्या फेसबुक पेजचा मालक अद्याप फरार आहे. मालपे पोलिसांत गुन्हा दाखल आहे. उडुपी पोलिसांनी हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने तपास सुरू ठेवला आहे.

आलिफ बांग्लादेश असल्याचा संशय

आलिफ इस्लाम हा बांगलादेशचा नागरिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याची ओळखपत्रे, मोबाईल डेटा आणि डिजिटल हालचालींची सखोल छाननी सुरू असून, संबंधित माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडेही पाठवली आहे.

Pakistan espionage Case
Jyoti Malhotra : भारताशी गद्दारी अन् पाकिस्तानसाठी हेरगिरी, ज्योती मल्होत्राचा असा झाला भांडाफोड!

FAQs :

1. या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली आहे?
आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

2. गुप्त माहिती कशाद्वारे पाठवली गेली?
फेसबुक पेजच्या माध्यमातून माहितीची देवाण-घेवाण झाल्याचे उघड झाले आहे.

3. फेसबुक पेजचा मालक सापडला आहे का?
नाही, संबंधित पेजचा मालक अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

4. कोणत्या यंत्रणा या तपासात सहभागी आहेत?
उडुपी पोलिसांसोबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही तपास करत आहेत.

5. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेसाठी किती गंभीर आहे?
भारतीय नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती लीक झाल्याने हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com