Nashik Mahanagarpalika : शिंदे गटाच्या नगरसेवकाला मोठा धक्का! आधी नगरसेवकपद गेलं, आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल

Shinde Sena corporator controversy : शिंदे गटाच्या नगरसेवकाला मोठा धक्का बसला आहे. आधी नगरसेवकपद गमावले आणि आता त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे.
Nashik corporator booked by police
Nashik corporator booked by policeSarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या होम ग्राउंड वरच मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर येथील पक्षाचे नगरसेवक विकी सिंग अपात्र ठरले. त्यानंतर त्यांच्या मागे आता शासनाचा ससेमीरा लागला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक विकी सिंग यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरला. त्यामुळे नगरसेवक पद रद्द झाले आहे.

नगरसेवक विकी सिंग यांनी बंजारा विमुक्त जात (ए) प्रवर्गातील जातीचा दाखला मिळवला होता. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या तहसीलदारांकडे ऑनलाईन अर्ज दाखल केला. त्यात दाखल कागदपत्रांच्या आधारे त्यांना दाखला देण्यात आला.

या जातीच्या राखीव प्रभागातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नगरसेवक म्हणून ते विजयी झाले होते. मात्र विरोधकांनी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार केली होती. हा मुद्दा राजकीय प्रतिष्ठेचा बनल्याने पाठपुरावा झाला.

Nashik corporator booked by police
SIR deadline extended : मतदारांसाठी खूशखबर! SIR अर्जासाठी पुन्हा मिळाली मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म?

महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी विकी सिंग लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते. काही महिन्यापूर्वी याबाबतचा अधिकृत आदेश त्यांनी काढला.

आता नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी संबंधित जात पत्राची पडताळणी केली. त्यात बनावट कागदपत्र आढळले. त्यामुळे सरकार वाडा पोलीस ठाण्यात विकी सिंग यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विकी सिंग यांना डबल शॉक बसला आहे.

कसा मिळवला जातीचा दाखला?

विकी सिंग लबाना यांनी जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्र दिले होते. त्यात वीज बिल, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वंशावळी अशी बनावट कागदपत्र ऑनलाइन सादर केली. त्या आधारे प्रशासनाने त्यांना ऑनलाईन जातीचा दाखला दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com