Union Budget 2024 : 'मोदी सरकार 3.0' मधील पहिल्या अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला; अर्थमंत्री सीतारामन 'या' दिवशी सादर करणार!

Modi Sarkar 3.0 Union Budget 2024 News : संसद अधिवेशनाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत; या वर्षातील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.
 Budget 2024
Budget 2024Sarkarnama

Nirmala Sitaraman Union Budget 2024 : देशात अठरावी लोकसभा गठीत झाल्यानंतर आता मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळातील आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

खरंतर अठराव्या लोकसभेचं पहिलं सत्र समाप्त झालं आहे. यामध्य नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला आणि लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक झाली होती, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) यांनी संबोधित केले होते. आता सर्वांचे लक्ष मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पाकडे आहे. 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत संसदेचे सत्र चालणार आहे.

 Budget 2024
Rajabhau Vaje : शासनाचा अर्थसंकल्प हा लोकसभेतील दणक्याचा 'इफेक्ट'

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू(Kiren Rijiju) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती आपल्या एक्स हॅण्डलरवर दिली. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, भारत सरकारच्या शिफारशीनुसार देशाच्या राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांना 22 जुलै 2024 ते 12 ऑगस्ट 2024 पर्यंत बोलवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 हे 23 जुलै रोजी लोकसभेत सादर केले जाईल.

 Budget 2024
Video Ravindra Waikar : मोठी बातमी! खासदार रवींद्र वायकरांना 'क्लीन चिट', 'तो' गुन्हा गैरसमजातून दाखल

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखांची घोषणा होताच, याबाबतही अंदाज वर्तवले जात आहेत की, अर्थमंत्री मोदी(Modi) सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात करदात्यांसाठी काही लाभांची घोषणा करू शकतात. तसेच या वर्षात दोनदा अर्थसंकल्प सादर होत आहे. याआधी 1फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला होता. त्यानंतर आता नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com