Nirmala Sitharaman budget : पाच राज्यात घोषणांचा पाऊस! तामिळनाडूपासून बंगालपर्यंत निवडणुकांसाठी पायघड्या; केंद्राची तिजोरी मतदारांसाठी खुली!

election focused budget News : पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करीत असताना अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. रविवारी लोकसभेत 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी काय नवीन घोषणा केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या वर्षभरात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याठिकाणीच निवडणुका डोळयासमोर ठेवून पायघड्या अंथरण्यात आल्या आहेत. तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊस पडला आहे.

यंदा पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. केरळ वगळता इतर चार राज्यांमध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहेत. या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील इतर राज्याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Nirmala Sitharaman
BJP vs BVA : भाजप नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; 'बविआ'च्या 16 नगरसेवकांविरोधात...;महापौर निवडणुकीआधी 'वाॅर'

अर्थसंकल्प सादर करीत असताना निर्मला सीतारमण यांनी भारताच्या हाय-स्पीड रेल्वेच्या महत्वाकांक्षांना चालना देणारी घोषणा केली. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा उद्देश टियर-२ आणि टियर-३ शहरांना मोठ्या शहरी केंद्रांशी जोडणे, रेल्वेला रस्ते आणि कमी अंतराच्या हवाई प्रवासाचा स्वच्छ, वेगवान पर्याय म्हणून पुन्हा स्थापित करणे आहे.

Nirmala Sitharaman
NCP President : अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती, भाजप नेते पियुष गोयल यांची घोषणा

त्यासोबतच ओडिसा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात समर्पित मिनरल पार्क बांधली जातील. याशिवाय, वाराणसी ते सिलीगुडीपर्यंत रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच, केरळ आणि तमिळनाडूसह इतर राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

Nirmala Sitharaman
Chandrapur Congress Crisis : 'ते' नगरसेवक धानोरकर की वडेट्टीवारांचे ? चंद्रपूरमध्ये वाद वाढला, सत्ता जाण्याच्या भीतीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetaraman) यांनी तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यामध्ये मिनरल्ससाठी डेडिकेटेड कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, “रेअर अर्थ परमानेंट मॅग्नेटची योजना नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आली होती. रेअर अर्थ मिनरल्समध्ये चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सारख्या मिनरल-समृद्ध राज्यांना खाणकाम, प्रक्रिया, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Nirmala Sitharaman
Ajit Pawar death : ...आता शिंदेंचा शिलेदार म्हणतो, 'अपघाताची चौकशी झालीच पाहिजे!' फडणवीसांवर वाढला दबाव?

रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव

पुणे-मुंबई, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई, हैदराबाद-चेन्नई, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलीगुडी या मार्गांना ग्रोथ कनेक्टर म्हणून विकसित केले जाईल. तसेच येथे रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हे कॉरिडॉर पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागांना जोडतात. यामुळे औद्योगिक हब, टेक्नॉलॉजी सेंटर, तीर्थक्षेत्रे आणि उदयोन्मुख शहरी समूहांना जलद, अधिक एकात्मिक नेटवर्कमध्ये आणणे. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी दुर्गापूरला उत्तर-पूर्व औद्योगिक कॉरिडॉरशी जोडण्याची घोषणा केली.

Nirmala Sitharaman
BJP vs BVA : भाजप नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; 'बविआ'च्या 16 नगरसेवकांविरोधात...;महापौर निवडणुकीआधी 'वाॅर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com