BJP strategy : दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग! भाजपच्या सर्व आमदारांची बोलावली बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता

political developments Delhi News : येत्या वर्षभरात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : संसदेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मांडत असताना येत्या वर्षभरात होत असलेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. येत्या वर्षभरात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यातच आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपच्या गोटात वेगवान राजकीय घडामोडी घडत असून दिल्लीत सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याने मोठ्या निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. या ठिकाणाची राष्ट्रपती राजवटीची मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपने (BJP) तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत आता वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजप हायकमांडने मणिपूरमधील आपल्या सर्व आमदारांना तसेच एनडीएच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे.

BJP Flag
Ajit Pawar Death : ‘अजितदादांनी मुलाच्या लग्नाला सुनेत्रावहिनींसह जोडीने येण्याचा शब्द दिला होता; पण नियतीने घात केला’

भाजपच्या आमदारांना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत दिल्लीत उपस्थित राहण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीने आजच काही आमदार दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पक्षाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, जेव्हा राज्यातील राष्ट्रपती राजवट संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या राज्यात फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे, विधानसभेचे कामकाज स्थगित आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवटीला एक वर्ष पूर्ण होणार आहे.

BJP Flag
Ajit Pawar Asthi Kalash : स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश छगन भुजबळ घेऊन येणार; नाशिक व येवल्यात दर्शनासाठी ठेवणार

त्यामुळे आता मणिपूरमधील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. आता येत्या काळात लवकरच संभाव्य राजकीय पुनर्रचना, प्रशासन निर्णय आणि राज्याच्या भविष्यासाठी रोडमॅपची चर्चा करण्यासाठी आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे या सर्व घटनाक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.

BJP Flag
Ajit Pawar : अजितदादांनी केला शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान; खंबीर नेतृत्वाची अन् कृतीची नाशिकमधील 'त्या' घोषणेमुळे आठवण...

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट 13 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आता एका आठवड्यात मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊ शकते. त्याच्यात तयारीसाठी भाजपने आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. त्यामुळे आता मणिपूरमध्ये कधी सरकार स्थापन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BJP Flag
Ajit Pawar Asthi Kalash : स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश छगन भुजबळ घेऊन येणार; नाशिक व येवल्यात दर्शनासाठी ठेवणार

दरम्यान, दुसरीकडे याबाबत सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी यांनी आमदारांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. तसेच भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा यांनी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आहे, आता 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

BJP Flag
Devendra Fadnavis News: मोदी सरकारने भगतसिंह कोश्यारींना 'पद्मभूषण' पुरस्कार का दिला? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं मोठं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com