

केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचे पुत्र बंदी भागीरथ यांच्यावर पॉक्सो आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
भागीरथ यांनी स्वतःला हनीट्रॅपचा बळी असल्याचा दावा करत ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी झाल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणामुळे तेलंगणात मोठी राजकीय खळबळ उडाली असून पोलीस तपास आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Minister of State for Home Affairs Bandi Sanjay Kumar Son News : केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी भागीरथ हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर एका १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर हैदराबाद येथे त्याच्यावर लैंगिक छळ, लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे आणि लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र बंदी भागीरथ याने आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा केला आहे. तसेच त्याने आपण कोणत्याही प्रेमप्रकरणात गुंतलेलो नसून मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव टाकला जात आहे. तर नकार दिल्याने ५ कोटी रुपयांची मागणी मुलीच्या कुटुंबीयांकडून झाल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पॉक्सो कायद्यामुळे केंद्रीय मंत्र्यासह मुलगा बंदी भागीरथच्या अडचणी वाढल्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हैदराबादमधील पेट बशीरबाद पोलीस ठाण्यात बंदी भागीरथच्या विरोधात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भागीरथने आधी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले आणि तिच्याशी संबंध ठेवले. तसेच मोईनाबाद येथील एका फार्महाऊस नेत मुलीवर अत्याचार केला. ज्यानंतर या वादाला तोंड फुटले असून मुलगी १७ वर्षांची असल्याने पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर अद्याप पोलिसांनी भागीरथला चौकशीसाठी बोलावलेले नाही.
दरम्यान या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून पीडित मुलीच्या घरच्यांनी तक्रार देण्याआधीच भागीरथने करीमनगर पोलिसांत तक्रार दिली. भागीरथच्या म्हणण्यानुसार, तो काही महिन्यांपूर्वी त्या मुलीला भेटला होता आणि तिच्या कुटुंबाने त्याला अनेक धार्मिक यात्रा आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले होते. यानंतरच मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप करण्याची धमकी दिली. तसेच कुटुंबाने ५ कोटी रुपयांची मागणी देखील केली.
आता दोन्ही बाजूंकडून तक्ररी देण्यात आल्या असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भागीरथविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने त्याच्यासह भाजपच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. तर आता या प्रकरणाचा तपास करताना दोन्ही पक्षांचे जबाब, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्याबरोबर पीडित मुलीचा जबाब आणि तिची वैद्यकीय तपासणीनंतरच भागीरथला अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे झाले असून भाजपवर हल्ला करण्यासाठी विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. विरोधक या प्रकाराविरोधात जोर लावत आहेत. तर भाजप समर्थक याला हनीट्रॅप आणि राजकीय कट म्हणत आहेत. यामुळे हैदराबाद येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तपासानंतरच आता सत्य बाहेर येणार आहे.
त्यांच्यावर लैंगिक छळ, लग्नासाठी दबाव आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
त्यांनी स्वतःला हनीट्रॅपचा बळी असल्याचे सांगत ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप केला आहे.
कारण या प्रकरणात केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांच्या कुटुंबाचे नाव समोर आले आहे.
पोलीस दोन्ही बाजूंच्या आरोपांची चौकशी करत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पॉक्सो म्हणजे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी बनवलेला विशेष कायदा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.