

Hardeep Singh Puri Resigns : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी त्यांच मंत्रीपद कायम राहणार आहे. कारण यापूर्वीच त्यांची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली आहे. पण यानंतर आता त्यांचं मंत्रीपद बदललं जाणार की तेच राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
माजी सनदी अधिकारी असलेले हरदीपसिंग पुरी हे सध्या केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. पुरी हे राज्यसभा खासदार असून उत्तर प्रदेशातील जागेवरुन ते यापूर्वी राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची सहा वर्षींची टर्म अद्याप संपलेली नाही, पुढील वर्षी २०२७ मध्ये ही टर्म संपणार आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पण नुकतीच त्यांची मध्य प्रदेशातील जागेवरुन पुन्हा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली असल्यानं त्यांची खासदारकीची नवी टर्म सुरु होणार आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिलेल्या उत्तर प्रदेशातील जागेवर पोटनिवडणूक लागू शकते.
दरम्यान, सध्या हरदीपसिंग पुरी यांच्याकडं मंत्रीपद आणि खात्याचा कारभार असला तरी त्यांच्या सध्याच्या राजीनाम्यामुळं यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सहा महिन्यांत सदस्यत्व मिळवणं गरजेचं असतं, अन्यथा अशा मंत्र्याचं मंत्रीपद आपोआप संपुष्टात येतं. त्यामुळं आधीच मध्य प्रदेशातील जागेवर हरदीपसिंग पुरी यांची पुन्हा राज्यसभेवर निवड झाल्यानं या सहा महिन्यांचा कालावधीच्या नियमाची त्यांना अडचण होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.