

Karnataka News : अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी ‘संपूर्ण देश हादरून जाईल’, अशी माहिती उघड करण्याचा इशारा केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची माहिती जनतेसमोर मांडण्यात कोणतीही तडजोड करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ते आई चन्नम्मा यांच्या समाधीला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद बोलत होते.
सरकारमधील मंत्र्यांच्या अखत्यारीतील विभागांतच केपीएससी आणि एईई भरती घोटाळे झाले आहेत. लाखो तरुणांच्या भावनांचा गैरफायदा घेत पैसे उकळले आहेत. हे आरोप आपण करत नसून कागदपत्रेच हे सर्व सांगत आहेत. मी कोणत्याही व्यक्तीविरोधात पुरावे नसताना बोलत नाही. अमेरिकेला जाण्यापूर्वी जे सांगितले होते, त्यावर आम्ही ठाम आहोत. माझ्या काही मित्रांनी काँग्रेसच्या कथित गैरप्रकारांची माहिती उघड करण्यासाठी मला काही कागदपत्रे दिली आहेत.
माझ्याकडील पेनड्राइव्ह वेगळा असून, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दाखविलेला पेनड्राइव्ह वेगळा आहे. मी रिकामा पेनड्राइव्ह घेऊन फिरत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बिडदी, नाईस आणि केपीएससी प्रकरणांचा उल्लेख होताच परप्पन अग्रहार आणि पेनड्राइव्हचा मुद्दा पुढे आणला जात आहे. प्रज्वल रेवण्णा दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील दृश्ये असल्याचे आता सांगितले जात आहे.
दरम्यान आता केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, हवे ते बोला, हवे ते जाहीर करा, असा पलटवार करताना, ‘कोणी काहीही बोलू दे, कोणत्याही विषयावर चर्चा करू दे. कोणाला थांबवता येणार आहे का?’ असा सवाल केला आहे.
तसेच कोणीही कोणत्याही विषयावर चर्चा करावी, हवे ते दस्तऐवज जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी कुमारस्वामी यांना दिले. दरम्यान, कुमारस्वामी यांनी आपण कोणत्याही व्यक्तीविरोधात पुराव्याशिवाय बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘अमेरिकेला जाण्यापूर्वी मी जे वक्तव्य केले होते, त्यावर मी ठाम आहे. भाजप नेत्यांच्या राजकारणात राज्याच्या हिताचा कोणताही विचार नसून, केवळ राजकीय मानसिकता दिसून येते. त्यांना सुधारता येणे कठीण आहे, अशी देखील टीका शिवकुमार यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.