Political Family Shooting : केंद्रीय मंत्र्याच्या भाच्यांकडून एकमेकांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, आईलाही लागली गोळी...

Union Minister Nityanand Rai Bihar Crime and Law Updates : नित्यानंद राय यांचे भाचे विश्वजित आणि जयजीत यादव हे बिहारमधील जगतपूर गावात राहत होते.
Murder in Bihar
Murder in BiharSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांनी एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर केंद्रीय मंत्र्यांचा दुसरा भाचा गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईच्या हाताला गोळी ललागली. कुटुंबातील वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

नित्यानंद राय यांचे भाचे विश्वजित आणि जयजीत यादव हे बिहारमधील जगतपूर गावात राहत होते. दोघेही शेतकरी. सुरूवातीला दोघांमध्ये पाण्यावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोघांमध्ये धाकटा असलेल्या जयजीतने विश्वजितवर गोळीबार केला. त्यानंतर विश्वजितनेही भावावर गोळ्या झाडल्या.

Murder in Bihar
Karnataka Politics: होऊ दे खर्च! 'हवाई सफरी'वर मुख्यमंत्र्यांची कोटींच्या कोटी उड्डाणे; जनतेच्या पैशांची उधळपट्टी!

गोळीबारामध्ये त्यांच्या आईच्या हातालाही गोळी लागली. परिसरातील नागरिकांना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात नेण्याआधीच विश्वजितचा मृत्यू झाला. तर जयजीतची प्रकृतीही गंभीर आहे. भाजपचे आमदार डॉ. एन. के. यादव यांच्या रुग्णालयात दोघांवर जयजीत व त्याची आई हिना देवी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिक्षक प्रेरणा कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली. घरगुती वादातून दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच आई तिथे आलली. त्यामुळे त्यांच्या हातालाही गोळी लागली, अशी माहिती प्रेरणा कुमारी यांनी दिली.

Murder in Bihar
Nitin Gadkari News : गडकरींकडून संसदेत काँग्रेसच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोलखोल; खर्गेंना दिले सडेतोड उत्तर...

दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्यांनीच एकमेकांवर गोळीबार केल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली. भाच्यांकडे पिस्तुर कुठून आले, त्याचा परवाना होता का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे. तपासानंतर नेमकं काय घडलं, हे स्पष्ट होईल.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com