मुलायमसिंहांचा आशीर्वाद घेऊन स्मृती इराणी उतरल्या यूपीच्या मैदानात

राज्यसभा सकाळी १० ते २ व लोकसभा दुपारी ४ च्या पुढे अशा वेळा राहतील.
Smriti Irani, Mulayam Singh Yadav
Smriti Irani, Mulayam Singh Yadavsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्याबद्दल मात्र भाजप (BJP) नेते-मंत्री सातत्याने आदर दाखवताना पुन्हा दिसत आहेत. केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या आज (ता. ३१) संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या वाहनाची वाट पहात होत्या. त्याच वेळी मुलायमसिंह यादव तेथे आले. त्यांना पाहताच इराणी यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मुलायमसिंह यांनीही इराणी यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.

Smriti Irani, Mulayam Singh Yadav
बड्या नेत्यांनी धक्का देताच भाजपकडून मित्रपक्षांना पायघड्या

त्यावर इराणी यांनी आपल्या गाडीला तांबण्यास सांगून मुलायमसिंह यांना गाडीपर्यंत हात धरून नेले व नंतर त्या उत्तर प्रदेशच्या प्रचारसभेसाठी रवाना झाल्या. उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) निवडणुकीचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. कोरोनामुले यंदाही राज्यसभा व लोकसभा वेगवेगळ्या वेळांत कामकाज करतील. राज्यसभा सकाळी १० ते २ व लोकसभा दुपारी ४ च्या पुढे अशा वेळा राहतील. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वार्धातील जेमतेम १० दिवसांतही अनेक खासदार प्रचाराच्या कामात असल्याने संसदेत हजर राहणार नाहीत, हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झाले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठेच्या लढाईत आपल्या युतीच्या दोन्ही पक्षांबरोबरचा जागावाटप फॉम्यूर्ला निश्चित केल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. यानुसार निषाद पक्षाला १० तर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anipriya Patel) यांच्या अपना दलाला वाढवून दिलेल्या १८ जागा भाजपने सोडल्या आहेत. ४०३ पैकी उर्वरीत जागांवर भाजपचे (BJP) उमेदवार निवडणूक लढतील.

Smriti Irani, Mulayam Singh Yadav
भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

उत्तर प्रदेशात स्वामीप्रसाद मौर्य व अन्य काही आमदारांनी भाजप सोडल्याने धक्का बसला आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवार यादी जाहीर होताच उसळलेल्या पक्षांतर्गत असंतोषाच्या धक्क्यातून सावरताना भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने अनेक निर्णय घेतले. युतीतील दोन्ही पक्षांबरोबर जागावाटपात आधीपेक्षा बरेच लवचिक धोरण भाजपने स्विकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com