NCP merger news : शरद पवारांची भेट अन् विलीनीकरणाच्या चर्चांवर पटेल पहिल्यांदाच बोलले; 10 नोव्हेंबरनंतर काय होणार?

Nationalist Congress Party, Sharad Pawar, Praful Patel, Sunil Tatkare : शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेलो होतो, असे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
Praful Patel clarified that no discussions on the NCP merger took place during his meeting with Sharad Pawar at Breach Candy Hospital.
Praful Patel clarified that no discussions on the NCP merger took place during his meeting with Sharad Pawar at Breach Candy Hospital.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP merger talks update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सुनील तटकरे यांनी अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती, १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होते, असा गौप्यस्फोट केला होता.

आदल्याचदिवशी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत १० नोव्हेंबरनंतर भेटण्याबाबतच्या चर्चेचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे विलीनीकरण होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यातील चर्चेचा रुग्णालयातील व्हिडिओ समोर आल्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा सुरूवात झाली होती. त्यावर आता खुद्द पटेल यांनीच खुलासा केला आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी आजच्या परिस्थितीत कुठलीही चर्चा आम्ही हॉस्पिटलमध्ये करणार आहोत का?, असा सवाल करत विलीनीकरणावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

पटेल यांनी दोघांमधील चर्चेचा संदर्भ सांगितला. ते म्हणाले, मी म्हणत होतो ८-९ तारखेला मी गोंदियाला असतो. त्यांनाही माहिती आहे. १० तारखेनंतर मुंबईला येतो, तेव्हा परत भेटतो, असे मी म्हणत होतो. हॉस्पिटलमध्ये फार काही चर्चा करायची स्वाभाविकपणे माझीही इच्छा नव्हती आणि ते योग्यही नव्हते. पवारांविषयी माझ्या मनात आदर आहे आणि उद्याही राहील.

Praful Patel clarified that no discussions on the NCP merger took place during his meeting with Sharad Pawar at Breach Candy Hospital.
Devendra Fadnavis news : महिला सरपंचांचे धाडस, थेट CM फडणवीसांनाच मागितली पोच पावती; राज्यात पहिल्यांदाच असं घडलं...

शरद पवार यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पीटलमध्ये गेलो होतो. भेटल्यावर काही ना काही चर्चा होते. आता साहेब घरी आले असून दिवाळीनिमित्त त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन, असेही पटेल यांनी म्हटले आहे.

Praful Patel clarified that no discussions on the NCP merger took place during his meeting with Sharad Pawar at Breach Candy Hospital.
PM Modi news : मुख्यमंत्री फडणवीस यांची 'ही' कृती मनाला स्पर्श करणारी! PM मोदींना दिवाळीत कोणती गोष्ट भावली?

दरम्यान, सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाची चर्चा झाल्याचे मान्य केल्यानंतर प्रफुल पटेल यांनी पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीतील चर्चेबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे आता १० नोव्हेंबरनंतर पटेल हे शरद पवारांची पुन्हा भेट घेणार का, या भेटीत काय चर्चा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.