Trump vs China : भारतापासून अवघ्या 150 किमीवर असलेल्या सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचा डोळा : चीनच्या कोंडीसाठी अमेरिकेने केला मोठा करार

Donald trumps Malacca Strait Strategy : अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात एक संरक्षण करार होणार आहे. ज्याचा परिणाम थेट चीनवर होण्याची शक्यता आहे. नुकतंच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यात एक बैठक पार पडली.
Malacca Strait Strategy | China Tension
Malacca Strait Strategy | China TensionSarkarnama
Published on
Updated on

Malacca Strait Strategy : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार इशारा आणि धमक्या देऊनही इराण काही मागे हटण्यास तयार नाही. त्याचं कारण म्हणजे इराणचं होर्मुझ सामुद्रधुनीवर असलेलं नियंत्रण. या होर्मुझ सामुद्रधुनीची नाकाबंदी करून इराण संपूर्ण जगाला वेठीस धरत आहे.

त्यामुळे इराणला कसं नमवायचा हा एकच प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना सतावत आहे. नुकतचं पाकिस्तानमधील शांती वार्ता फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेचे नौदल होर्मुझ सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रत्येक जहाजाची नाकाबंदी करणार असल्याची घोषणा केली.

तर दुसरीकडे आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा भारतापासून अवघ्या 150 किमीवर असलेल्या मलाक्का सामुद्रधुनीवर वळवला आहे. या सामुद्रधुनीचा वापर करून अमेरिका चीनची आर्थिक कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या डोक्यात नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यात एक संरक्षण करार होणार आहे. ज्याचा परिणाम थेट चीनवर होण्याची शक्यता आहे. नुकतंच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यात एक बैठक पार पडली. या दोन्ही देशांमधील संरक्षण करार मलाक्का सामुद्रधुनीवरून चीनच्या निर्माण झालेल्या तणावाशी संबंधित आहे. तर इंडोनेशिया अमेरिकेला त्यांची हवाई हद्द वापरण्याची परवानगी देऊ शकतो.

Malacca Strait Strategy | China Tension
Chandrapur Murder Case : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात रक्तरंजित थरार! डीजेसमोर नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

मलाक्का सामुद्रधुनी मलेशिया आणि इंडोनेशियाचे सुमात्रा बेट यांच्या मध्यभागी असून ती हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडते. या सामुद्रधुनीची लांबी अंदाजे 900 किलोमीटर आहे तर काही ठिकाणी तिची रुंदी 3 किलोमीटरपेक्षा कमी आहे. चीन आजही आपल्या तेल आणि वायूचा बहुतांश भाग या सामुद्रधुनीमार्गे आयात करतो. या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यास चीनच्या अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते.

त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रासंदर्भातील वाटाघाटी सुरू केल्याचं बोललं जात आहे. तर इंडोनेशिया सोबत संरक्षण करार करत अमेरिका आपली नौदल शक्ती पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तज्ञांचं मत आहे. आखाती देश आणि आफ्रिकेतील तेल समुद्रमार्गे चीनपर्यंत पोहोचते. सर्वात लहान आणि स्वस्त मार्ग भारतातून पुढे जात मलाक्का सामुद्रधुनीतून आणि इंडोनेशियाच्या वळसा घालून जातो.

Malacca Strait Strategy | China Tension
America Vs Iran War: इराणसोबत चर्चा फिस्कटली, डोनाल़्ड ट्रम्प यांनी फिरवला थेट PM मोदींनाच फोन; तब्बल 40 मिनिटं चर्चा...

तर हा मार्ग त्यानंतर ज्या भागांमधून जातो तिथे अमेरिकेचे नौदल आपल्या मित्र राष्ट्रांसह अनेक वर्षांपासून उपस्थित आहे. याच ठिकाणांवरून अमेरिकेचे नौदल चीनकडे जाणाऱ्या जहाजांवर पाळत ठेवते. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी सागरी मार्गाला युद्धातलं प्रमुख शस्त्र बनवलं त्याचप्रमाणे ट्रम्प देखील इंडोनेशियाबाबत ते धोरण अवलंबत असून मलाक्का सामुद्रधुनीवर आपलं वर्चस्व प्रस्थापिक करून ते चीनची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com