Chandrapur Murder Case : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात रक्तरंजित थरार! डीजेसमोर नाचण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

Chandrapur murder case during Ambedkar Jayanti celebration: रविकांत टेंभूरकर (वय ३६) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गांधी चौकात डीजे समोर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून रविकांत टेंभूरकर आणि तिथल्या काही तरूणांचं भांडणं झालं.
Ambedkar Jayanti Chandrapur Incident | Youth Murder Case
Ambedkar Jayanti Chandrapur Incident | Youth Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News, 15 Apr : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, चंद्रपूर शहरात आंबेडकर जंयतीला गालबोट लावणारी घटना घडली आहे.

चंद्रपूर शहरातील गांधी चौकात इंदिरानगर येथील भीम रत्न बहूउद्देशीय अनुयायी मंडळाने आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आयोजित केली होती. या मिरवणुकी दरम्यान मध्यरात्री डीजेसमोर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रविकांत टेंभूरकर (वय ३६) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गांधी चौकातील मिरवणुकीत डीजे समोर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून रविकांत टेंभूरकर आणि तिथल्या काही तरूणांचं भांडणं झालं.

Ambedkar Jayanti Chandrapur Incident | Youth Murder Case
Satbara WhatsApp Service : महसूल विभाग आणखी अ‍ॅडव्हान्स : नागरिकांना सातबारा, 8-अ उतारे थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार; फक्त 3 स्टेप्स ठेवा लक्षात

हा वाद इतका टोकाला गेला की पाच जणांनी मिळून रविकांत टेंभूरकरला भोसकलं आणि क्षणात मिरवणुकीत रक्ताचा सडा पडला. दरम्यान, जखमी रविकांतला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे आंबेडकर जयंतीला गालबोट लागलं आहे.

Ambedkar Jayanti Chandrapur Incident | Youth Murder Case
Sahar Sheikh News: 'कैसे हराया..' फेम MIM नगरसेविकेचे पद जाणार; तहसीलदारांकडून मोठी कारवाई

एकीकडे या हत्येच्या घटनेनंतर चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भीम जयंतीच्या मिरवणुकीत शस्त्र घेऊन फिरणाऱ्या युवकांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचा तपास करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com