पुतीन यांचा काटा तुम्हीच काढा! अमेरिकेच्या खासदाराचं जाहीर आवाहन

पुतीन यांना त्यांच्याच देशाचे नागरिक आवर घालू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates
Vladimir Putin | Russia Ukraine War News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाची (Russia) जागतिक पातळीवर कोंडी केली जात आहे. यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. आता अमेरिकेच्या खासदाराने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची हत्या करण्याचे थेट आवाहन रशियन नागरिकांना करुन खळबळ उडवून दिली आहे. पुतीन यांना त्यांच्याच देशाचे नागरिक आवर घालू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम (Lindesy Graham) यांनी रशियन नागरिकांना हे आवाहन केले आहे. ग्रॅहम हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती सहकारी मानले जात. आता त्यांनीच थेट पुतीन यांना मारण्याची भाषा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सगळे संपणार कसे? आता रशियातील कुणाला तरी पाऊल उचलावे लागले आणि पुतीन यांना मारावे लागेल. रशियातील जनताच पुतीनला धडा शिकवू शकेल. तुम्ही तुमच्या देशासोबत जगासाठीही मोठी सेव यातून कराल.

Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates
रशियाला दणका! आता 'एसबीआयने'ही घातले आर्थिक निर्बंध

ग्रॅहम हे 20 वर्षांहून अधिक काळ खासदार आहेत. त्यांनी संसदेत रशियाचे अध्यक्ष आणि रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांचा निषेध करणारा ठरावही मांडला आहे. युद्ध गुन्हे आणि मानवतेविरोधातील गुन्हे केल्याप्रकरणी हा निषेधाचा ठराव मांडण्यात आला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत सुमारे 350 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, असा दावा युक्रेन सरकारने केला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. याचरोबर किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत.(Russia-Ukraine War Updates)

Vladimir Putin | Russia Ukraine War News Updates
विधानसभा अध्यक्ष निवडीला आव्हान देणाऱ्या महाजनांना न्यायालयात 10 लाख भरावे लागणार

युक्रेनमधून 10 लाख नागरिक स्थलांतरित

दरम्यान, युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली. युक्रेनवर रशियाने तीन बाजूंनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक नागरिक जीवाच्या आकांताने देश सोडून पलायन करीत आहेत. युरोपमधील शेजारी देश असलेल्या पोलंडसह रोमानिया आणि इतर देशांमध्ये हे युक्रेनचे नागरिक आश्रय घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com