PCMC Mayor Threat: पिंपरी चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी,पोलिसांच्या हेल्पलाईनवरुनच कॉल; आरोपीबाबत धक्कादायक बाब समोर

Pimpri Chichwad News: पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना पोलिसांच्या समाधान हेल्पलाईन वर कॉल करुन धमकी देण्यात आली आहे. आशिष जमदाडे-पाटील असं धमकी दिलेल्या आरोपीचं नाव आहे. ही बाब बुधवारी (ता.20) उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धमकी देणारी व्यक्ती महापौरांना यापूर्वी दोनवेळा भेटल्याचं समोर आलं आहे.
PCMC Mayor Ravi Landge Threat
PCMC Mayor Ravi Landge ThreatSarkarnama
Published on
Updated on

Pimpri chinchwad News: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांची मोठी वाढ होताना दिसून येत आहे. यावरुन विरोधकांकडून सातत्यानं कायदा व सुव्यवस्थेचा मु्द्दा उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना पोलिसांच्या समाधान हेल्पलाईन वर कॉल करुन धमकी देण्यात आली आहे. आशिष जमदाडे-पाटील असं धमकी दिलेल्या आरोपीचं नाव आहे. ही बाब बुधवारी (ता.20) उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धमकी देणारी व्यक्ती महापौरांना यापूर्वी दोनवेळा भेटल्याचं समोर आलं आहे.

महापौर रवी लांडगे धमकी प्रकरणातील आरोपी ही क्रीडा संबंधित काही कामानिमित्त भेटली होती. पण यानंतर त्यानं थेट धमकी देण्यापर्यंत मजल मारल्यानं मोठी खळबळ उडाली होती. ही धमकीची घटना समोर येताच भोसरी पोलिसांनी आरोपी आशिष जमदाडेला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली.

आशिष जमदाडे यांनी मी रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे,अशी भाषा वापत पोलीस आयुक्तालयाच्या 'समाधान हेल्पलाईन'वर कॉल करत ही धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवल्यानंतर जमदाडेला ताब्यात घेतलं होतं.

PCMC Mayor Ravi Landge Threat
Maharashtra MLC election: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजकीय भूकंपाची नांदी! राष्ट्रवादीची पीछेहाट अन् शिवसेनेचा वाढता आलेख

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आशिष जमदाडे मानसिक तणावात असल्याचं समोर आलं होतं. यानंतर जमदाडेला पोलिसांनी त्यांच्या खाकी वर्दीच्या भाषेत समज देत सोडून दिलं. याविषयी स्वत:महापौर रवी लांडगे यांनीच माहिती दिली आहे.

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती आली आहे. यानंतर भाजपकडून महापौरपदासाठी रवी लांडगे यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. रवी लांडगे रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 26 वे महापौर बनले आहेत.

लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडमधील एक प्रमुख नेते असून भोसरी परिसरातील सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांचे मोठे योगदान असून ते सलग दोनवेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळवल्यानंतर लांडगे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती.

PCMC Mayor Ravi Landge Threat
BJP vs NCP news : भाजपला 'दे धक्का', आमदाराच्या घरात फूट; भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

रवी लांडगे यांचे चुलते व दिवंगत अंकुशराव लांडगे हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थात अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुढे येत असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रुजवण्यासाठी अंकुशराव लांडगेंचा वाटा मोठा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com