Savitribai Phule
Savitribai Phule

धक्कादायक : पोलिसांनी माजी महिला खासदाराचे केस ओढले अन् धक्काबुक्की करीत गाडीत ढकललं

माजी महिला खासदाराचे केस ओढून पोलिसांनी तिला गाडीत ढकलल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Published on

लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या माजी महिला खासदाराचे केस ओढून पोलिसांनी त्यांना गाडीत ढकलल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे मोठा गदारोळ उडाला असून, उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम केला होता. त्या मृत शेतकऱ्यांचा कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी पोलिसांना त्यांना रोखले. पोलिसांनी त्यांचे केस ओढून धक्के मारत पोलीस गाडीत ढकलले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सावित्रीबाई फुलेंच्या सोबत झालेले गैरवर्तन पाहून अतिशय व्यथित झाले आहे. तुम्ही ठाम राहून अशाच लढत राहा.

Savitribai Phule
येडियुरप्पांनी डोळे वटारताच भाजप नरमली; मुलावर सोपवली मोठी जबाबदारी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाल असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Savitribai Phule
चांगले कपडे घालण्यावरून दोन मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com