Kerala Congress Politics : मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधील काँग्रेस नेता PM मोदींचं नाव घेऊन फसला; केरळमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर...

Kerala Congress controversy : मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगताना सतीशन यांनी पंतप्रधान मोदींचे उदाहरण देणारा डाव त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे.
VD Satheesan
VD Satheesan Sarkarnama
Published on
Updated on

Kerala politics update : केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता काबीज केली आहे. डाव्या पक्षांचा पराभव करून काँग्रसेने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळविली आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार, यावरून रस्सीखेच सुरू झालेली आहे. पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, व्ही. डी. सतीशन या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. त्याचवेळी आता पक्षातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे.

सतीशन हे विरोधी पक्षनेते असून मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनीही आपला दावा सांगितला आहे. काही भागात त्यांचे भावी मुख्यमंत्री असे फलकही लागले आहे. तर सोशल मीडियातूनही त्यांच्या समर्थकांकडून जोरदार पाठिंबा दिला जात आहे. त्याचवेळी त्यांच्या एका विधानामुळे त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

सतीशन यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण दिल्याने ते अडकले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी प्रशासकीय अनुभव हा मुद्दा नाही. व्ही. एस. अच्युतानंदन यांच्याकडे अनुभव होता का? नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्याकडे तरी कुठे प्रशासकीय अनुभव होता? ते पक्षाचे संयोजक होते. वरिष्ठ खासदारही नव्हते, असे सतीशन म्हणाले आहेत.

VD Satheesan
Governor role in government formation : महाराष्ट्र 2014, मणिपूर 2017, कर्नाटक 2018..! आता तमिळनाडू 2026... राज्यपाल झटका देणार?  

मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगताना सतीशन यांनी मोदींचे उदाहरण देणारा डाव त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे. सतीशन यांच्या या विधानानंतर सोशल मीडियात त्यांच्या विरोधात सूर उमटू लागला आहे. एकीकडे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी हालचाली सुरू असतानाच अशी वक्तव्ये पक्षाच्या नेत्यांबाबत संभ्रम निर्माण करणारी ठरू शकतात.

VD Satheesan
Tamil Nadu political crisis : तमिळनाडूत घडामोडींना वेग; विजय यांना दोनदा परत पाठवलं, आता पलानीस्वामींची राज्यपालांकडे धाव

सतीशन यांनी के. सी. वेणुगोपाल यांनाही अप्रत्यक्षपणे टार्गेट केल्याचे दिसते. त्यामुळे आता पक्षनेतृत्व सतीशन यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या वक्तव्यामुळे सतीशन यांनी दावेदारी मागे पडू शकते. पुढील एक-दोन दिवसांत काँग्रेसकडून अंतिम नावाची घोषणा केली जाईल. पण तोपर्यंत पक्षांतर्गत वादावर चर्चा झडणार आहे. सतीशन यांनी तसे संकेत दिले आहेत. पक्षनेतृत्वाला पक्षातील नेत्यांची नाराजीही दूर करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com