INDIA Alliance : मुख्यमंत्र्याची पक्षासह इंडिया आघाडीत एन्ट्री, अधिकृत भूमिका जाहीर

Vijay TVK INDIA Alliance : तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकम टागोर म्हणाले की, इंडिया आघाडीसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे.
India Alliance meeting
India Alliance meetingSarkarnama
Published on: 
Updated on: 

Vijay TVK : इंडिया आघाडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डीएमके हा इंडिया आघाडीतून बाहेर पडला असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू वेत्री कळघम ने 'इंडीया' आघाडीत सामील होण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

चेन्नईतील काँग्रेसचे मुख्यालय, सत्यमूर्ती भवन येथे झालेल्या आघाडीच्या बैठकीत सहभागी होऊन टीव्हीकेच्या दोन मंत्र्यांनी औपचारिकपणे आघाडीचा शुभारंभ केला. चेन्नईतील या महत्त्वाच्या बैठकीत टीव्हीकेचे निवडणूक व्यवस्थापन महासचिव आणि मंत्री आधार अर्जुन आणि अर्थमंत्री मेरी विल्सन यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले.

तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकम टागोर म्हणाले की, इंडिया आघाडीसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. CM विजय यांच्या निर्णयामुळे संपूर्ण आघाडी आणखी मजबूत होईल.

India Alliance meeting
Form-7 controversy : Form-7 प्रकरण पेटलं! भाजप नेत्यांची DGP-IGPकडे धाव; कार्यकर्त्यांवर गुन्हे, आंदोलनाचा इशारा

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन

या बैठकीत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 'इंडीया' आघाडी राज्यभरात जिल्हास्तरीय जोरदार आंदोलने करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मनमानी आणि बेकायदेशीरपणे काम केले आहे, ज्यामुळे १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असा आरोप या बैठकीत करण्यात आला.

India Alliance meeting
UP Election 2027: युपी निवडणुकीची रणधुमाळी! 'संविधान बचाओ, बीजेपी हटाओ'चा थेट नारा देत माजी मंत्र्याचा पक्ष INDIA आघाडीत सामील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com