Tejashwi Yadav : विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळला, माजी उपमुख्यमंत्र्यांचा दावा किती सत्य?

Tejashwi Yadav Virat Kohli : तेजस्वी यादव हे आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने आता दिल्ली कॅपिटल्स नावाने प्रसिद्ध असलेल्या संघाचा भाग होते.विराट कोहली तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली खेळला की नाही, यावरून चर्चा सुरू आहेत
 Virat Kohli
Virat Kohlisarkarnama
Published on
Updated on

Tejashwi Yadav News: क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या रिंगणात येऊन अनेक खेळाडू मोठे राजकारणी झाले. बिहाराचे माजी उपमुख्यमंत्री, लालु यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी देखील क्रिकेटर म्हणूनच आपली कारकिर्द सुरू केली होती. मात्र, तेथे यश न मिळाल्याने ते राजकारणात आले.

तेजस्वी यादव यांनी एका मुलाखतीमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आपल्या नेतृत्वाखाली खेळला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू आपले मित्र असल्याचा दावा केला आहे.

विराट कोहली तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळला की नाही, यावरून सोशल मिडियामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पण तेजस्वी यादव हे आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने आता दिल्ली कॅपिटल्स नावाने प्रसिद्ध असलेल्या संघाचा भाग होते.

 Virat Kohli
Kiran Lahamate : आमदार लहामटेंची कठोर भूमिका; अजितदादांची महायुतीत झाली कोंडी

विराट कोहली तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळले की नाही याचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र आयपीएलमध्ये तेजस्वी यादव यांनाच फार कमी संधी मिळाल्याचे दिसून येते. दिल्ली अंडर 15 संघात तेजस्वी यादव होते. आणि दिल्लीसंघाकडूनच विराट कोहली खेळत होता त्यामुळे ते दोघे एकाच संघात असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

तेजस्वी यादव यांनी चार टी-20 सामने खेळले आहेत. तर दोन लिस्ट एसाठी आणि झारखंड संघाकडून एक प्रथम श्रेणीचा सामना खेळला आहे. तेजस्वी यादव यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वयोगटातील क्रिकेट खेळले आहे. मात्र विराट कोहली झारखंडकडून कधीच क्रिकेट खेळला नाही.

राजकारण यशस्वी...

क्रिकेटचे मैदान सोडून राजकारणाच्या मैदानात आलेल्या तेजस्वी यादव यांना राजकारणात चांगले यश मिळाले. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. शिवाय, आरजेडी या पक्षाचे नेतृत्व देखील तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून देखील तेजस्वी यांनी काम पाहिले आहे.

 Virat Kohli
Rahul Mote News : राजकारणापलीकडचा स्नेह अन् सोडून गेलेल्यांसह आरोग्यमंत्र्यांनाही इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com