Rahul Mote News : राजकारणापलीकडचा स्नेह अन् सोडून गेलेल्यांसह आरोग्यमंत्र्यांनाही इशारा

Political News : विधान परिषदेत उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल भाजपचे परंडा येथील माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Rahul Mote, Sujitsinh Thakur
Rahul Mote, Sujitsinh Thakur Sarakarnama
Published on
Updated on

आनंद खर्डेकर

Dharashiv News : मानवी संबंध राजकारणाच्या पलीकडेही असतात. राजकीय विरोधक हा आपला शत्रू नसतो, मतभेद वैचारिक असतात, मनभेद नसतो. या बाबींची प्रचिती भूम-परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या एका कृतीने आली. राजकीय विरोधक असलेले भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा माजी आमदार मोटे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. आपली साथ सोडलेल्या परंड्यातील काही नेत्यांसह आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनाही त्यांनी याद्वारे इशारा दिल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर (Sujitsinh Thakur) यांना विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषणाबद्दल नुकतेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या निमित्ताने माजी आमदार राहुल मोटे यांनी परंडा येथे ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. माजी आमदार मोटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विधानसभा निवडणुकीत भूम-परंडा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राहुल मोटे (Rahul Mote ) हे 2019 पूर्वी सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले होते. (Political News)

धाराशिवचे पालकमंत्री असलेले डॉ. तानाजी सावंत यांनी 2019 च्या निवडणुकीत राहुल मोटे यांचा पराभव केला. त्यानंतर मोटे यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनीही नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावरील या घडामोडींमुळे मोठी अडचण होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबााळकर यांना तब्बल 81 हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे राहुल मोटे यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे.

Rahul Mote, Sujitsinh Thakur
Eknath Shinde : महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र काय? CM शिंदेंनी सांगितला भाजपच्या निकषापेक्षा वेगळा 'फॉर्म्युला'

मोटे आणि ठाकूर यांची भेट 'जुळून येती राजकीय गाठी' अशी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आधी दोन दिवस भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोटे यांना मदत केल्याची चर्चा अजूनही होतच असते. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेतल्याचे मतदारसंघात बोलले जाते. याला भाजप किंवा राहुल मोटे यांच्यावतीने कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुतीची सत्ता आली. या मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. सावंत आरोग्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री झाले.

गेल्या अडीच वर्षांत डॉ. सावंत यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम, मेळावे घेतले. मात्र, त्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नगण्यच राहिली. थेट विरोध न करता विरोधक कसे उपयोगी पडतील, अशी भूमिका घेणाऱ्या माजी आमदार मोटे यांनी 15 वर्षांच्या आमदारकीच्या काळात विरोधात असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार ठाकूर यांच्यासह अन्य विरोधकांनाही दुखावले नाही. राजकीय मदत घेण्याची दारे कायम उघडी ठेवली. माजी आमदार ठाकूर यांना शुभेच्छा देण्यामागे, हा उद्देश असू शकतो, अशी चर्चा आहे.

Rahul Mote, Sujitsinh Thakur
Dhangar reservation : मोठी बातमी! धनगर आरक्षणासाठी सरकार जीआर काढणार, 'त्या' शब्दातील संभ्रम दूर होणार?

मराठवाड्याला मिळणाऱ्या उजनी धरणातील पाण्यासाठी माजी आमदार ठाकूर यांनी प्रयत्न केले, हे सांगायला मोटे विसरत नाहीत. वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे पालकमंत्री डॉ. सावंत हे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असणार, हे निश्चित आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी राहुल मोटे हे प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार मोटे हे विविध कार्यकमांत एकत्र दिसत आहे. पाटील हेही दावेदार आहेत. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी प्रामाणिकपणे काम करणार, अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली आहे.

माजी आमदार मोटे यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी, परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. सौदागर यांनी साथ सोडल्याचा फारसा फटका बसणार नाही, याची काळजी मोटे घेत आहेत. मोटे यांनी गावोगावी भेटी सुरू केल्या आहेत. साखरपुडा व लग्न आदी घरगुती कार्यक्रमांत त्यांची हजेरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच राजकीय विरोधक असणाऱ्या भाजपच्या माजी आमदारांचा सत्कार करून राजकीय गाठी जुळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

Rahul Mote, Sujitsinh Thakur
Aditi Tatkare News : महिलांसाठी आर्थिक सुरक्षा महत्त्वाची; आदिती तटकरेंनी दिले विरोधकांच्या टीकेला उत्तर

शिंदे गटही सक्रिय

गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री डॉ. सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा समन्वयक प्रा. गौतम लटके यांनी गावभेट दौरे सुरु केले आहेत. गावोगावी रस्त्यांची कामे भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहेत. अनेकांचे शिवसेना (शिंदे गटात) पक्ष प्रवेश सुरू आहेत. भैरवनाथ साखर कारखान्यावर समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जवळच्याच काही लोकांच्या वागण्याचा फटका देखील पालकमंत्री डॉ. सावंत यांना बसणार नाही, याची ते किती काळजी घेतात. यावर बरेच काही अवलंबून आहे.

Rahul Mote, Sujitsinh Thakur
Mahayuti News : लातूर जिल्ह्यातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा; शिंदे गटाचा या दोन जागेवर दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com