West Bengal politics : बंगालच्या निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; विजयाची खात्री असलेल्या उमेदवाराची मतदानाच्या दोन दिवस आधीच माघार, निकालच फिरला

Jahangir Khan withdrawal, Falta repoll news : तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर यांनी माघार घेताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक केले.
TMC vs BJP
TMC vs BJPSarkarnama
Published on
Updated on

Trinamool Congress latest news : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर दररोज राजकीय धक्के बसत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी फालटा विधानसभा मतदारसंघातील गोंधळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली होती. या मतदारसंघात २१ मेला फेरमतदान आहे. पण त्याच्या दोन दिवस आधीच तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी माघार घेतल्याने ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे.

जहांगीर खान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. हा मतदारसंघ ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहे. अत्यंत हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून त्याची बरीच चर्चा झाली होती. खुद्द अभिषेक बॅनर्जी यांनी २ मेला भाजपच्या नेत्यांना फालटा जिंकण्यासाठी तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील, असे आव्हान दिले होते. जहांगीर यांनीही प्रचारादरम्यान स्वत: पुष्पा म्हणत भाजपसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला होता.

सिंघम विरूध्द पुष्पा

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फालटामध्ये मतदान होणार होते. मात्र, काही गैरप्रकारांमुळे आयोगाने निवडणूक पुढे ढकलली आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांनी या मतदारसंघाला छावणीचे स्वरूप दिले होते. तसेच जहांगीर यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यावर जहांगीर यांनीही तुम्ही 'सिंघम' असाल तर मीही 'पुष्पा' आहे, असे म्हणत ललकारले होते.

TMC vs BJP
PM Modi vs Rahul Gandhi : भाजपच्या 'त्या' विजयात काँग्रेसला दिसू लागला आशेचा किरण; राहुल गांधींच देऊ शकतात PM मोदींना टक्कर?

बंगाल निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जहांगीर यांच्याविरोधात पोलिसांनी काही गंभीर गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांमध्ये अटक करू नये, अशी मागणी करणारी याचिका खान यांनी कोलकाता हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टानेही सोमवारी खान यांना दिलासा दिला होता. पण त्यानंतर काही तासांत मंगळवारी खान यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खान हे अभिषेक बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

TMC vs BJP
IPS Vishwas Nangre Patil : आचारी बदला म्हणण्याची हिंमत झाली नाही, हीच स्थिती सध्या देशाची! विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पोस्ट व्हायरल, सरकारनेच केला खुलासा

सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक

आश्चर्याची बाब म्हणजे जहांगीर यांनी माघार घेताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक केले. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, 'मी फालटा शांत राहावे आणि विकसित व्हावे, असे मला वाटते. आपले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी फालटाच्या विकासासाठी विशेष पॅकेज देणार आहेत. त्यामुळे मी फेरमतदानापासून स्वत:ला दूर करत आहे.' दरम्यान, खान यांच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार देवांगशू पांडा यांचा विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार अब्दूर रझ्झाक मोल्ला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभू नाथ कुर्मी हेही रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com