Assembly Election Result live : बंगाल, तमिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर? निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीत सगळे चित्र क्लिअर...

West Bengal election result live, Tamil Nadu election result update : तमिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीकेने तब्बल १०३ जागांवर आघाडी घेत मातब्बरांचा सुपडा साफ करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे.
Assembly Elections Results 2026
Assembly Elections Results 2026Sarkarnama
Published on
Updated on

ECI official results India : देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार, हे निकालाच्या सुरूवातीच्या कलांमध्ये जवळपास स्पष्ट झाले आहे. बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून तमिळनाडूत सुपरस्टार विजयने चमत्कार केला आहे.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने डाव्यांचा गड उद्धस्त केला आहे. आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएने सत्ता काबीज केल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये स्पष्ट झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सकाळी ११ वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बंगालमध्ये २९४ पैकी १६७ जागांवरील सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने जोरदार आघाडी घेतल्याचे दिसते. भाजपला १०४ तर तृणमूल काँग्रेसला ६० जागांवर आघाडी मिळाली आहे.

तमिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीकेने तब्बल १०३ जागांवर आघाडी घेत मातब्बरांचा सुपडा साफ करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. एडीएमके ६७ तर डीएमके ३८ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत काँग्रेसला ५८ जागांवर तर सत्ताधारी डाव्या पक्षांना ४० जागांवर आघाडी होती. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफची सत्ता येणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Assembly Elections Results 2026
West Bengal Election Results Live Update : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा बहुमताचा आकडा पार, टीएमसीची 15 वर्षांची सत्ता जाणार

आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची जादू चालली आहे. भाजपने तब्बल ७६ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे फक्त २६ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुदुच्चेरीमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ३० पैकी १७ जागांचे कल हाती आले असून सत्ताधारी ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे ८ तर भाजपचे दोन उमेदवार आघाडीवर होते.

निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी

पाच राज्यांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागांवर आघाडी -

पश्चिम बंगाल - एकूण - २९४, कल - १६७

भाजप - १०४

तृणमूल काँग्रेस - ६०

इतर - ३

Assembly Elections Results 2026
Baramati and Rahuri By Election Result Live Update : सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीत नवा विक्रम

तमिळनाडू - एकूण -२३४, कल - २२७

टीव्हीके - १०३

एडीएमके - ६७

डीएमके - ३८

पीएमके - ७

काँग्रेस - ३

इतर - ९

आसाम - एकूण - १२६, कल - १२६

भाजप - ७६

काँग्रेस - २६

बीओपीएफ - १०

एजीपी - १०

इतर - ४

केरळ - एकूण - १४०, कल - १४०

काँग्रेस - ५८

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - ३०

इंडियन युनियन मुस्लिम लीग - २३

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - १०

इतर - १९

पुदुच्चेरी - एकूण - ३०, कल - १७

ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस - ८

भाजप - २

डीएमके - २

काँग्रेस - १

इतर - ४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com