West Bengal EVM News : नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. तेथे भाजपचे सरकार देखील स्थापन झाले आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या एका महिन्यानंतर धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बुधवारी (ता.12) कोलकत्तामधील सरकारी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तब्बल चार हजार ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्याची माहिती आहे. या आगी विषयी संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कोलकाता पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन आज (शुक्रवार) केली आहे.
पश्चिम बंगालमधील मंत्री कौशिक चौधरी यांनी या घटनेविषयी माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, दक्षिण कोलकातामधील अलीपूर भागातील नऊ मजली इमारतीला बुधवारी आग लागली. या इमारतीमध्ये अन्य सरकारी विभागांसोबत 24 परगना जिल्हा परिषदेचे कार्यालय देखील होते.
कौशीक यांनी सांगितले की, अंदाजे चार हजार ईव्हीएम मशीन या आगीत पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. या मशिन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या होत्या. 10 मतदारसंघात या ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात आला होता.
मंत्री चौधरी म्हणाले की, ही सामान्य आग वाटत नाही. आम्ही तपास करत आहोत की प्लॅन करून कोणी हे केले आहे का? ९ मजल्यापर्यंत ही आगा कशी पोहोचली? सर्वात प्रथम दुसऱ्या तसेच तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती, याची माहिती देखील त्यांनी दिली.
टीएमसीने आगीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नांपासून पळ काढतो. ईव्हीएम आणि सीसीटीव्ही सुरक्षीत ठेवण्यासाठी आम्ही पहिलेच न्यायालयात गेलो होतो. तरी देखील ही घटना कशी काय घडली? खरची ही दुर्घटना आहे की पुरावे निष्ट करण्याचे नियोजित प्रयत्न आहेत, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.