

Mamata Banejee news : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. जवळपास ६० आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांनीही पक्षाविरोधात उभे राहण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जींना काही तासांत झटका बसला आहे.
ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आणि राज्यसभेतील पक्षाचे सर्वात ज्येष्ठ खासदार सुखेंदू शेखर राय यांनी खासदारकीसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला. ममतांच्या पक्षाचे खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सुरू असतानाच हा पहिला राजीनामा ठरला आहे. लोकसभेतील २० खासदार वेगळा गट स्थापन करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सुखेंदू शेखर राय हे २०११ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. ममता बॅनर्जी यांनी सलग तीनवेळा त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांना स्थान होते. त्यामुळे राय यांच्या राजीनामा ममतादीदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षप्रमुख दिल्लीत असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने या घटनाक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.
राजीनामा दिल्यानंतर राय यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत जनतेने १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसवर अविश्वास दाखविला आहे. पक्षातील भ्रष्टाचार, महिलांवर होत असलेला अन्याय तसेच आरोग्य, उद्योग, रोजगार, कायदा-सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे लोकांनी पक्षाला नाकारले.
जनतेने बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला मोठ्या बहुमताने पाठिंबा दिला. आता या सरकारने आपल्या वचननाम्याप्रमामे बंगालच्या विकासाचे काम सुरू केले आहे. जनतेच्या या ऐतिहासिक निर्णयाचा स्वीकार करत मी तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राय यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.