West Bengal News: पश्चिम बंगालमधून धक्कादायक अपडेट; माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, आरोपी महिला ताब्यात

Kolkata Crime News: कोलकाता येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या (AITC) नेत्या डोला सेन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता ममता बॅनर्जी त्यांच्या परिसरातील ‘मिलन संघ’ दुर्गापूजा मंडपाला भेट देण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.
mamata banerjee
mamata banerjeesarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolkata News : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक अपडेट समोर येत आहे. बॅनर्जी या त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे.

एक चाकू घेऊन आलेल्या महिलेने ममता बॅनर्जी यांना धमकी देण्याच्या उद्देशानं त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसकडून या हल्ल्यानंतर करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोलकाता येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या (AITC) नेत्या डोला सेन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता ममता बॅनर्जी त्यांच्या परिसरातील ‘मिलन संघ’ दुर्गापूजा मंडपाला भेट देण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली.

संबंधित महिलेचे नाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ती परिसरात नागरी स्वयंसेवक म्हणून ओळखली जात असून तिला अमली पदार्थांचं व्यसन असल्याची धक्कादायक बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

mamata banerjee
Amit Shah News: संयम संपला..! अमित शहांचा राहुल गांधींसह विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला मोठा इशारा, '2029 मध्ये त्यांनी मोठ्या पराभवाला...'

टीएमसीच्या नेत्या डोला सेन यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, “संबंधित महिला शिवीगाळ करत होती. ती नशेत असल्यासारखी वागत होती आणि तिने आक्रमकपणे ममता बॅनर्जी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे चाकूही होता. या महिलेने आपण ममता बॅनर्जी यांची भाची असल्याचा दावाही केला. त्यानंतर तिने रस्त्यावर झोपून गोंधळ घातला आणि ममता बॅनर्जी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला.

ममता बॅनर्जी यांना झेड-प्लस श्रेणीची सुरक्षा असताना, कथितरीत्या शस्त्र घेऊन आलेली महिला त्यांच्या निवासस्थानाजवळ कशी पोहोचू शकली, असा प्रश्न डोला सेन यांनी उपस्थित केला. या घटनेमागे कट असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. तसेच छायाचित्रे आणि व्हिडिओ फुटेज तक्रारीसोबत सादर केलेली असून ती तपासून योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डोला सेन यांनी पोलिसांकडे केली आहे.

mamata banerjee
Modi Government News: मोठी बातमी: आंदोलनं, मोर्चांनी घेरलेल्या मोदी सरकारला धक्का, आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com