

Sabina Yasmin resignation : पश्चिम बंगालमध्ये मागील काही महिन्यांत सातत्याने मोठा घडामोडी घडत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अन् अनेक खासदार, आमदार, नेते ममता बॅनर्जी यांना सोडून गेले. आता पक्ष-चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. या घडामोडी घडत असतानाच आमदारांच्या बंडखोर गटाला मोठा झटका बसला आहे.
आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ६० आमदारांनी बंड केले. आयोगाने या गटाला तृणमूल काँग्रेस डेमोक्रेटिक असे नाव देण्यात आले आहे. त्याआधी या गटाच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या गटाचे महिला अध्यक्षपद आमदार सबीना यास्मीन यांच्याकडे देण्यात आले होते. आता त्यांनीच या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
सबीना यास्मीन यांनी गटाचे अध्यक्ष बिप्लब मित्रा यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. राजीनाम्या देण्यामागे आरोग्याचे प्राथमिक कारण त्यांनी दिल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बंडखोर गटामध्ये खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलेले आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सबीना यास्मीन या बंडखोर गटात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना महिला संघटनेचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्याने बंडखोर गटाला झटका बसल्याचे मानले जात आहे. अंतर्गत वादाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी केंद्रीय निवडणूक आयोगात पक्ष-चिन्हाचा वाद सुरू असतानाच हा राजीनामा आल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
सबीना यास्मीन या आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे. बंडखोर गटाकडे सुमारे ६० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. निवडणूक आयोगाकडून पक्ष-चिन्ह देताना विधिमंडळातील संख्याबळ विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच सबीना यास्मीन यांनी पक्षातील महत्वाचे पद सोडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.