West Bengal Opinion Poll : पश्चिम बंगालमध्यो कोणाची सत्ता? 'ओपिनियन पोल'ने ममता बॅनर्जींची धाकधूक वाढणार, भाजप 100 पार...

West Bengal Mamata Banerjee TMC Vs BJP : निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील निवडणूक जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार याचा अंदाज ओपीनीयन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
West Bengal election news update TMC vs BJP
West Bengal election news update TMC vs BJPSarkarnama
Published on
Updated on

West Bengal Election : निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चार राज्यांमध्ये एका टप्प्यात तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिला ओपीनियन पोल समोर आला आहे. या पोलने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची धाकधूक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आईएएनएस- मैट्रिजच्या ओपीनीयन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये केवळ दोन टक्के मतांचे अंतर राहणार आहे. तृणमुलला 43 ते 45 टक्के मतं आणि भाजपला 41 ते 43 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मतांमध्ये केवळ दोन टक्कांचे अंतर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमध्ये सत्ता येण्याचा अंदाज या पोलने वर्तवला असून 293 जागांपैकी 155 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, गेल्या निवडणुकीत केवळ 70 जागा मिळालेला भाजप या वेळी 100 पार करताना दिसत असून 100 ते 115 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

West Bengal election news update TMC vs BJP
Assembly Election update : आचारसंहिता लागू होताच निवडणूक आयोगाचा ममता बॅनर्जींना मोठा झटका; संसदेतही उमटले पडसाद

काँग्रेसची पुन्हा निराशा

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची पुन्हा निराशा होताना दिसून येत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मिळून केवळ 13 टक्के मतं मिळताना दिसत आहेत. तसेच केवळ पाच ते सात जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

West Bengal election news update TMC vs BJP
Ambadas Danve News: कापून टाकू, फाडून टाकू म्हणत अंबादास दानवेंना धमकी देणारा निघाला भाजप कार्यकर्ता!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com