

West Bengal post poll violence : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांना टार्गेट करण्यात आले. काही ठिकाणी हिंसाचार उफाळला. जाळपोळीच्या घटना घडल्या.
तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांना बुलडोजर लावण्यात आलेच. आता हिंसेनं उग्र रूप धरलं आहे. भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने, राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोलकाताजवळील (Kolkata) माध्यमग्राम परिसरातील दोहरिया इथं ही घटना घडली. चंद्रनाथ रथ दत्त हे सार्वजनिक रस्त्यावरून कारने प्रवास करत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चंद्रनाथ रथ दत्त यांना चार गोळ्या लागल्या होत्या. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनीघटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांपैकी उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.
चंद्र नाथ दत्त हे 12 वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत काम करत होते. पश्चिम बंगालमधील आताच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या निवडणूक प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला आहे. हा पराभव तृणमूल काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची गेली १५ वर्षांची सत्ता भुईसपाट झाली आहे. भाजपने तिथं कमळ फुलवलं आहे. या निकालनंतर तिथं हिंसाचार भडकला आहे.
भाजपचे नवनिर्वाचित आमदार तरूणज्योती तिवारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘आम्ही शांततेचा संदेश देत आलो आहोत; मात्र तृणमूल काँग्रेसने मोठी चूक केली आहे,’ असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.