

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची 15 वर्षांची सत्ता अखेर गेली. भाजपने टीएमसीचा पराभव केला असून तब्बल 190 जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. अजून अंतिम निकाल जाहीर झाला नाही. मात्र, भाजपची सत्ता येणार हे निश्चत झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
टीएमसीमधून भाजपमध्ये आलेल्या आणि ममता बॅनर्जींच्या विरोधात लढत असलेल्या सुवेंधू अधिकारी यांचे नवा मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तेच मुख्यमंत्री असतील, असा दावा केला जात आहे.
सुवेंधू अधिकारी यांनी 2019 ला ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. मात्र, भाजपला तेव्हा सत्ता मिळवता आली नव्हती. आता तेथील भवानीपूर या ममता बॅनर्जींच्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. नंदीग्राममधून देखील ते उमेदवार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींना शिंगावर घेणार नेताच मुख्यमंत्री होणार असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
सुवेंधू अधिकारी यांचे वडील शिशिर कुमार युपीए सरकारच्य काळात मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. सुवेंदू यांनी आपली राजकीय सुरवात काँग्रेसमधून केली होती असे सांगितले जाते. 1995 मध्ये ते नगरपालिकेत काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर 2006 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.
डाव्या आघाडी सरकारच्या काळात नंदीग्राममध्ये उद्योगांच्या करिता जमीन अधिग्रगहण करण्यास सुरवात करण्यात आली. त्यावेळी त्याला विरोध करण्यासाठी प्रतिकार समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचे नेतृत्व सुवेंदू अधिकारी यांनी केले. या जनआंदोलनाने त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला. ममता बॅनर्जी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी उपोषण करत हा देशस्तरीय मुद्दा बनवला. त्यानंतर सुवेंदू हे टीएमसीमध्ये गेले आणि ममतांचे विश्वासू बनले. 2011 मध्ये टीएमसीची सत्ता आली त्यामागे सुवेंदूची भूमिकास रणनीती महत्त्वाची असल्याचे मानले जाते. 2016 ते 2020 या काळात ममतांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री देखील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.