

Teacher transfer case : पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांची भरती, बदल्यांचा मुद्दा मागील काही वर्षांत सातत्याने ऐरणीवर आला होता. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने बदलीसाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली असल्याची ऑडिओ क्लिप थेट हायकोर्टातच ऐकवली.
नेमकं काय घडलं?
राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता असताना घडलेला हा प्रकार कोर्टासमोरच उघडकीस आला आहे. कोलकाता हायकोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडित शिक्षकाने पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप ऐकवत आपले गाऱ्हाणे मांडले. ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी चौकशीचे आदेश दिले.
ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती संबंधित शिक्षकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागताना दिसत आहे. दोन लाख रुपये दिले तर पसंतीच्या ठिकाणी बदली केली जाईल, असे हा अज्ञात व्यक्ती शिक्षकाला म्हणत असल्याचे दिसते. संबंधित व्यक्ती कोण, याबाबतचा तपास करण्याचे आदेश देत कोर्टाने २५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून सुरूवातील नेमका शिक्षका फोन कुणी केला, हे तपासले जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्ती एखाद्या सराईत गुन्हेगार आहे की अन्य कुणी, याचीही पडताळणी होईल. या चौकशीतून अन्य शिक्षकांकडेही अशाप्रकारे लाच मागण्यात आली का, त्यानुसार त्यांची बदली झाली किंवा नाही, याबाबत आता पोलिसांकडून पाळेमुळे खोदून काढली जाण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळातील विविध निर्णय, घोटाळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आता शिक्षकांच्या बदलीचा मुद्दाही प्रकर्षाने समोर येणार आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कुठे कमी तर कुठे अधिक अशी आहे. शिक्षण विभागाने जुलै महिन्यातच अतिरिक्त शिक्षकांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हायकोर्टाने या निर्णयला स्थगिती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.