AIMIM News : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चात 'एमआयएम' का नाही? खासदार ओवैसींनी सांगितलं मोठं कारण

Gyanesh Kumar News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी आणि एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या विरोधकांच्या मोर्चात 'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सहभागी झाले नाहीत.
AIMIM ZP election
AIMIM ZP election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी गेल्या 2 दिवसांपासून राजधानी दिल्लीतलं वातावरण तापवलं आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनामा अन् एसआयआर प्रक्रियेविरोधात विरोधक एकवटले असताना एमआयएम पक्षानं मात्र,स्वत:ला या लढ्यापासून दोन हात लांबच ठेवल्याचं दिसून आलं आहे. यावर आता खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी आणि एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या विरोधकांच्या मोर्चात 'एआयएमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सहभागी झाले नाहीत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोर्चात सहभागी न होण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

खासदार असुदुद्दीन ओवैसी म्हणाले, मी तिथे गेलो नाही,कारण मी त्या इंडिया आघाडीचा भाग नाही. बेगानी शादी में मेरा क्या काम? अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. तसेच त्यांनी यावेळी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील वादावरही ओवैसी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया चुकीची आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारच्या बाजूने झुकलेली आहे. या प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही सर्वात मोठी समस्या आहे. ही प्रक्रिया चुकीची असून त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याची भूमिका ओवैसी यांनी मांडली.

AIMIM ZP election
Gokul News: 'गोकुळ'च्या निवडणुकीतील महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी पहिल्यांदाच आली समोर, माजी आमदारांसह दिग्गजांना संधी

बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यानही मी आवाज उठवला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या कायद्यात बदल करण्यात यावा, अशी माझी मागणी असल्याचंही ओवैसी यांनी सांगितलं आहे.

तसेच त्यांनी मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड झाली पाहिजे. ही एसआयआर प्रक्रिया चुकीची आहे. माझ्या मते, एसआयआर म्हणजे एकप्रकारे एनआरसीच असल्याचंही खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

AIMIM ZP election
Congress News: 'ईव्हीएम'वर शंका, बॅलेट पेपरवर निवडणुका, त्यातही काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का,भाजपचा दणदणीत विजय

खासदार औवैसी यांनी ‘एसआयआर’ आणि संभाव्य ‘एनआरसी’ प्रक्रियेबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, माझे आजोबा कबरीत आहेत. ते कबरीतून उठून यांना कागदपत्रे देतील का?, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशात जर ‘एनआरसी’ लागू करण्यात आली तर लोकांना आपली कागदपत्रं घेऊन लाईनमध्ये उभं राहावं लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच ‘1960,70 मध्ये माझे आजोबा कुठे होते? त्यासंबंधीची कागदपत्रं मी कुठून आणू? असा मुद्दाही त्यांनी एनसीआर प्रक्रियेवर बोलताना पुढे आणला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com