Waqf Amendment Bill : मुस्लिमांना गरज असतानाच ठाकरेंचे खासदार गायब; विधानसभेला हिशेब होणार, MIM नेत्याचा इशारा

Shivsena (UBT) Vs MIM, Waqf Amendment Bill : "संसदेत वक्फ विधेयक मांडण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे यांचे खासदार सभागृहात नव्हते. मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतदान केले, मग ते मुस्लिमांशी संबंधित विधेयकावेळी ते गैरहजर का होते?"
Asaduddin Owaisi, Uddhav Thackeray
Asaduddin Owaisi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Waqf Amendment Bill : अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी वक्फ बोर्ड (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत सादर केलं. वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर आक्षेप घेत विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे.

गुरुवारी या विधेयकावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी विरोध केला तरी सत्ताधाऱ्यांनी या विधेयकाचा बचाव केला. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी, काही लोकांनी संपूर्ण वक्फ बोर्डावर कब्जा केला असून सर्वसामान्य मुस्लिमांना न्याय देण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या विधेयकावर मतभेद असतानाच आता इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या विधेयकाबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. संसदेत वक्फ विधेयक सादर करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार गैरहजर होते. यावरुनच आता 'एआयएम'चे नेते वारिस पठाण यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Asaduddin Owaisi, Uddhav Thackeray
NMC Land Scam: भूसंपादन घोटाळा कोणाला भावणार?, आयुक्त रजेवर, भाजपची होणार कोंडी!

मुस्लिमांना गरज असताना ठाकरेंचे खासदार गायब

वारिस पठाण (Waris Pathan) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर प्रश्न उपस्थित करतना म्हटलं की, "संसदेत वक्फ विधेयक मांडण्यात आले तेव्हा उद्धव ठाकरे यांचे खासदार सभागृहात नव्हते. मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतदान केले, मग ते मुस्लिमांशी संबंधित विधेयकावेळी ते गैरहजर का होते? मुस्लिमांना गरज असताना ठाकरेंचे सर्व खासदार गायब झाले. महाराष्ट्रातील मुस्लिम हे बघत असून याचा हिशेब विधानसभेत होईल", असा इशाराही पठाण यांनी ठाकरे गटाला दिला.

Asaduddin Owaisi, Uddhav Thackeray
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : पूर्वी लोक 'मातोश्री'वर यायचे आणि आता..; खासदार शिंदेंची बोचरी टीका

शिवसेना नेते खासदार मिलिंद देवरा यांनीही देखील ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "संसदेतील उद्धव ठाकरेंच्या खासदारांचा खरा चेहरा आणि ढोंगीपणा उघड झाला आहे. वक्फ बोर्ड विधेयकावर चर्चा सुरू असताना ठाकरेंचे सर्व प्रतिनिधी गैरहजर होते. मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केले, पण त्या बदल्यात तुम्ही गप्प का? मुस्लिम या प्रश्नाचे उत्तर ठाकरे गटाकडे नक्की मागतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com